पुण्यातील बोपदेव घाटात आरोपीकडून गावठी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त...कोंढवा पोलिसांचे पेट्रोलिंग दरम्यान....!


पुणे
बोपदेव घाटात कंबरेला पिस्तुल लावून संशयितरित्या थांबलेल्या एका तरुणाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आणि त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल व तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. प्रसाद उर्फ सोन्या मारूती साबळे (वय-२०, रा. चिखली) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

कोंढवा पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना एक तरुण कंबरेला पिस्तुल लावून बोपदेव घाट येथे थांबला असल्याची माहिती पोलीस अंमलदार तुषार आल्हाट आणि गणेश चिंचकर यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक अनिल सुरवसे यांच्या पथकाने सापळा रचून बोपदेव घाटातील टेबल स्पॉटवर त्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तरुण घटनास्थळावरून पळून गेला. त्यामुळे पोलीस अंमलदार आल्हाट आणि चिंचकर यांनी त्याला पाठलाग करून पकडले

आरोपी तरुणाकडून गावठी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वी साबळे याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात यापूर्वी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या