अशोक चिवटे यांच्या सेंद्रिय शेतीची व व्यावसायाची पाहणी..! " प्रल्हाद वरे "

सातारा
 किन्हई-कोरेगाव जि. सातारा यांच्या सेंद्रिय शेतीची पाहणी करण्यासाठी  अशोक चिवटे यांच्या घरी गेलो असताना, ते एकत्रित कुटुंबात रहात असून त्यांच्या एकशे पाच एकर क्षेत्रात शंभर टक्के सेंद्रिय शेती केली जाते. गेली तीस वर्षापासून सेंद्रिय गुळ, गूळ पावडर व क्यूब बनवत आहेत. गेल्या पन्नास वर्षांपासून संपुर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करत आहेत तसेच शेतातील कुठलाही काडी-कचरा ऊस पाचट आजपर्यंत जाळलेले नाही. शेतात शेकडो प्रकारची वेगवेगळी झाडे लावली आहेत. घरासमोर देशी आंब्याचे  झाड १५० वर्षांचे असुन, त्या झाडाचे नाव माऊली असे ठेवले आहे. त्या झाडाचे आंबे अत्यंत गोड व स्वादिष्ट असे आहेत, त्या आंब्याचे आंबे आजपर्यंत कधीही विकलेले नाहीत, येणार्या जाणाऱ्या प्रत्येक लोकांना मोफत वाटप करत असतात.

चिवटे यांचे सर्व कुटुंबीय उच्चशिक्षित असून, ते सर्वजण शेतातील, गुळाची व इतर कामे घरच्याघरी करत असतात, त्यांची मुले, पुतणे हे पण कामाला हातभार लावतात, एकदा ऊस लावला की त्या उसाची पाच पिके घेतली जातात, आज त्यांच्या गुऱ्हाळाची पाहणी केली असता असे निदर्शनास आले की आतापर्यंत  शेकडो गुऱ्हाळे पाहिलीत पण एकही माशी नसलेले गुऱ्हाळ फक्त चिवटे यांचेच पाहण्यात आले.
यावेळी  एक्सपोर्टर श्री श्रीकांत काळे(रा. दुबई) तसेच दुसरे एक्सपोर्टर श्री राहुल अनपट (दुबई व रशिया) यांनी विविध शेती प्लॉटला आज भेटी दिल्या. एकंबे येथील चव्हाण यांचे आले प्लॉटला, तसेच सेंद्रिय घेवडा, सेंद्रिय ऊस प्लॉटला व इतर ठिकाणीही भेटी दिल्या.


सध्या चिवटे यांच्याकडे ४२ टण सेंद्रिय गूळ उपलब्ध असून, ते म्हणाले की  गुळाला मोठे मार्केट उपलब्ध होत नाही, त्यामुळे किरकोळच विक्री करावी लागते, बरोबर आलेले एक्सपोर्टर श्री काळे यांनी शेतीची एन.पी.ओ.पी. ची सर्व सर्टिफिकेटस व इतर रेकॉर्ड ची पाहणी केली व लगेच ३० टन गुळ खरेदी करू असा शब्द चिवटे यांना दिला. पुढील आठवड्यात चिवटे यांचा सेंद्रिय गुळाचा कंटेनर गल्फ कंट्रीत रवाना होईल. चिवटे हे गेली वीस वर्षापासून सर्व शेतीचे प्रमाणीकरण करत आहेत . ते एन.पी.ओ.पी. सर्टिफिकेशन धारक शेतकरी आहेत. आजच्या एक्सपोर्टर बरोबरच्या मीटिंग मधील पहिला कंटेनर जवळ जवळ बुक झालेला आहे. याच बरोबर इतरही शेतमाल मोठ्या प्रमाणात युरोप, गल्फ कंट्री व रशिया इत्यादी ठिकाणी मोर्फा च्या वतीने निर्यात होणार आहे, त्यामुळे इथून पुढील काळात शेतकऱ्यांनी विषमुक्त व सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यास मार्केटिंग मोठ्या प्रमाणात मिळेल.

मा.श्री युगेंद्रदादा पवार (व्यवस्थापकीय संचालक, महा ऑरगॅनिक ॲन्ड  रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन(मोर्फा) हे स्वतः सेंद्रिय शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच त्यास मार्केटिंग मिळण्यासाठी प्रयत्नशील असतात व त्यासाठी त्यांचे मोठे काम चालू आहे, शेतकरी ते ग्राहक अशी बाजारपेठ तयार व्हावी ही आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची इच्छा असून, त्यासाठी मा. युगेंद्रदादा पवार यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मोठे काम मोर्फाच्या वतीने चालू आहे.


श्री अशोक चिवटे यांचेकडे व्हिजीट देण्यासाठी मा. डॉ. विकास बाबा आमटे आले होते, त्यावेळी त्यांनी व्हिजीटर बुक मध्ये असे लिहिले आहे की, जर माझा पुनर्जन्म झाला तर तो चिवटे यांच्या घरी व्हावा, अशी मी देवाकडे प्रार्थना केली आहे,  हे पाहून चिवटे यांच्या कार्याबद्दल आदर वाटला,  सेंद्रिय व विषमुक्त शेती विषयी राज्यातील इतर शेतकऱ्यांनी पाहणी करून आपल्या शेतीत बदल करून घ्यावा, हे कुटुंब नावीन्यपूर्ण शेती अवजारे व इतरही कामे घरचे घरी करत असतात, आपणही त्यांची शेती अवश्य पाहून यावे, श्री अशोक चिवटे यांना मोर्फाच्या कार्यकारिणी वर घ्यावे असे मा. युगेंद्रदादा पवार यांनी सांगितले होते त्यानुसार त्यांची सातारा जिल्हा कमिटीवर नियुक्ती केली आहे.


आजच्या सातारा व्हिजीट करते वेळी श्री प्रल्हाद वरे (सचिव, मोर्फा), श्री अंकुश पडवळे (अध्यक्ष, मोर्फा), श्री अमरजित जगताप ( संचालक, मोर्फा), श्री बाळासो घोरपडे (अध्यक्ष, मोर्फा-सातारा जिल्हा), श्री अशोक वरे, श्री रणजित जगताप, श्री नितीन झगडे व श्री विक्रम कुदळे तसेच परिसरातील नवउद्योजक व प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या