काल दिनांक 15/03/22 रोजी बारामती येथील सोमेश्वरनगर येथे त्रिदल सैनिक सेवा संघ, बारामती (सोमेश्वरनगर) येथे करंजेपुल गावचे सुपुत्र Hav अजीज शेख साहेब यांच्या सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा तसेच कुमारी मोनिका पवार ही बारामती तालुक्यातील पहिलीच मुलगी आसाम रायफल मध्ये भरती होऊन 9 महिन्याचे खडतर आणी यशस्वी ट्रेनिंग करून आलेली. या दोघांचा भव्य सत्कार सोहळा आणी भव्य मिरवणूक पार पडली. यासाठी संदीप भाऊ लगड साहेब आणी सौ. भारती लगड मँडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. बारामती तालुक्यातील विविध भागांतून सैनिक आले होते यात दादा जांबळे साहेब आणी त्यांचे सहकारी आणी विविध सामजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. उपस्थितीत सर्वच मान्यवरांचे आभार माानण्यात आले.
0 टिप्पण्या