लाखेवाडी, इंदापूर तालुका त्यांच्या सहभागात्मक ग्रामीण मूल्यमापन (पीआरए) उपक्रमाचा एक भाग म्हणून, कृषी महाविद्यालय बारामतीच्या कृषिदुतांनी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ लाखेवाडी गावाचा रांगोळी नकाशा तयार करून त्यांची सर्जनशीलता आणि सामाजिक भावना प्रदर्शित केली.
रंगीबेरंगी आणि तपशीलवार रांगोळी नकाशात गावाचा आराखडा, खुणा, रस्ते, जलस्रोत आणि कृषी क्षेत्र यांचा समावेश असून, गावाच्या भूगोल आणि सामाजिक-आर्थिक वैशिष्ट्यांबद्दल विद्यार्थ्यांची समज अधोरेखित केली आहे.
यया प्रयत्नाला गावकऱ्यांकडून उत्साह आणि कौतुक मिळाले, कृषिदूत अथर्व साळुंखे, प्रतिक मोरे, आनंद धर्माळे, प्रतिक सदाफळ,श्रेयस भोसले, रुद्र कुतवळ , अनुराग वळवी, वेंकट वैभव यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांना कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड आणि प्रा. एस. व्ही. बुरुंगले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
0 टिप्पण्या