गेल्या कित्येक दिवसापासून माळशिरस तालुक्यामध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले असून भारतीय जनता पार्टीमध्ये विधान परिषदेवर कार्यरत असलेले आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील तसेच त्यांच्या कुटुंबावर ती वारंवार खालच्या पातळी टीका टिप्पणी केली जात आहे परंतु माळशिरस तालुक्यामध्ये राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की मोहिते-पाटील यांच्याकडून ज्या लोकांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही किंवा घेतला नाही अशांनाच फक्त मोहिते पाटील यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार असल्याचे बोलले जात आहे कारण ज्या लोकांना पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल कारखान्याचा संचालक असेल किंवा बाजार समितीचा संचालक असेल खासदार असेल आमदार असेल अशा अनेक पदावरती काम करण्याची संधी मोहिते पाटील यांच्यामुळे अनेकांना मिळाली आहे परंतु तेच लोक आज मोहिते-पाटील यांच्या विरोधामध्ये छाती काढून तालुक्यामध्ये फिरताना दिसत आहेत यामुळे आणि जे लोक छाती काढून तालुक्यामध्ये फिरत आहेत त्या लोकांनी देखील आपण शिवामृतचे संचालक, बाजार समितीचे संचालक, कारखान्याचे संचालक, पंचायत समिती जिल्हा परिषदेत आमदार असेल खासदार असेल आपल्याला कुणामुळे संधी मिळाली याचा देखील आत्मपरीक्षण त्यांनी करावं तसेच ज्यांनी मोहिते पाटील यांच्याकडून लाभ घेतला आहे अशांना कोणत्याही प्रकारे मोहिते पाटील यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही असे देखील राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. मोहिते-पाटील यांच्या जवळ त्यांच्या गाडीचे दरवाजे उघडणारे त्यांची तासंतास शिवरत्न बंगल्याच्या बाहेर हाराळी वरती वाट बघत बसणारे दादासाहेब भैय्यासाहेब म्हणून कित्येक कामं करून घेत होते ते संपूर्ण तालुक्याने उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे परंतु नेमकं या काही दिवसांमध्ये असं काय घडलं तेच लोक आज यांच्यावर अतिशय खालच्या व गलिच्छ भाषेत टीकाटिप्पणी करत आहेत ज्या लोकांना मोहिते पाटलांच्या कुठल्याही गोष्टीचा लाभ घेतला नाही किंवा त्यांना कोणत्या गोष्टीचा लाभ मिळाला नाही त्याच लोकांना फक्त मोहिते-पाटील यांच्यावर टीका टिप्पणी करण्याचा नैतिक आहे असं जुन्या जाणत्या सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे अतिशय खालच्या पातळीवर माळशिरस तालुक्याचे राजकारण गेल असुन कोणीही उठ सुट मोहिते-पाटील यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत बोलत आहेत जे मोहिते-पाटील विरोधक आहेत त्यांना देखील हे कदापी मान्य नाही येणाऱ्या काळामध्ये मोहिते पाटील यांच्यावर होत असलेल्या टीका टिप्पणीला मोहिते पाटील कुटुंब देखील त्या टीका करणाऱ्या लोकांना किंवा टीकेला भिक घालणार नाहीत मोहिते पाटील कुटुंबातील व्यक्तींवर होत असलेल्या खालच्या पातळीवर टीका या मोहिते पाटील विरोधकांना सुद्धा मान्य नाहीत? वेळप्रसंगी मोहिते-पाटील यांच्या पायावरती डोके ठेवून पाया पडून राजकीय लाभ व्हावा म्हणून अनेकांनी प्रयत्न केले लाभ ही घेतले आहेत परंतु मोहिते पाटील यांच्याकडून राजकीय लाभ होत नसल्याने त्यांना अतिशय खालच्या भाषेत बोललं जात आहे हे देखील माळशिरस तालुक्यातील जनतेला कदापिही मान्य नाही असी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
0 टिप्पण्या