लद्दाख अपघातात सात जवान जागीच ठार तर १९ गंभीर जखमीं....!


लडाख
तुर्तुक, नुब्राजवळ बस अपघातात लष्कराचे सात जवान ठार तर १९ गंभीर जखमी झाले.आज सकाळी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने लष्करातील काॅण वायबस रस्त्यावरून घसरून श्योक नदीत कोसळली. .
 
 सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 22 मराठा लीचे 26 सैनिक आज सकाळी परतापूर संक्रमण शिबिरातून तुर्तुक सेक्टरमधील सब सेक्टर हनीफ येथे पुढे जात होते. Sub विजय शिंदे ,Nb.Sub गुरुदयाल साहू, L/Hav मोहम्मद सैजल , Nk/Clk रामानुज कुमार ,Nk प्रशांत जाधव, L/Nk बाप्पादित्य खुटिया, Sep संदीप कुमार पाल 
 

 अपघातात सात जवान जागीच ठार झाले. १९ गंभीर जखमींना हंडर फील्ड युनिटमध्ये नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना लष्कराच्या विमानाने चंदीगडला हलवण्यात आले.

काश्मीरमधील ग्लेशियर - सियाचीन भागात २२ मराठा जवानांच्या बसला अपघात झाला . यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक येथील जवानाचा मृत्यू झाला . प्रशांत शिवाजी जाधव ( वय २७ ) असे मृत जवानाचे नाव आहे . त्यांच्या निधनाची माहिती मिळताच तालुक्यात शोककळा पसरली आहे . शनिवारी ( दि . २८ ) खास विमानाने त्यांचे पार्थिव बेळगाव येथे आणण्यात येणार आहे .बसर्गे येथे अंत्यसंस्कार होणार आहे .

 सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण आल्याने सध्या खटाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. विजय शिंदे यांचे पार्थिव रविवारी विसापूर येथे आणले जाणार आहे. तिथेच शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. विजय शिंदे हे सध्या लडाख परिसरात कार्यरत होते. ते १९९८ साली २२ मराठा लाईट इन्फ्रन्ट्रीमध्ये रुजू झाले होते. तेव्हापासून सुभेदार विजय शिंदे यांनी देशाच्या विविध भागांमध्ये लष्करी सेवा  बजावली आहे. विसापूर हे गाव लष्करी परंपरेसाठी ओळखले जाते. विजय शिंदे यांचे वडीलही लष्करात होते. तर त्यांचे बंधू प्रमोद शिंदे हे भारतीय लष्करात पॅरा कमांडो आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या