अल्पवयीन तरुणीशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवणाऱ्या तरुणांसह वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक नाही...!

अल्पवयीन तरुणीशी जबरदस्तीने शरीरसंबंध  ठेवणाऱ्या तरुणांसह वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक नाही...! 




दौंड -कुरकुंभ 
दौंड तालुक्यातील मळद येथील एका तरूणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून २०१६ वर्षांपासून ती अल्पवयीन असल्यापासून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेऊन नंतर लग्नास नकार देणारा तरूण व त्याच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या  ३७६ , ३१५ , ५०६ , ३४ , ४ , ६ ,८ , १२ या कलमांतर्गत बलात्कार, बाल लैगिक अत्याचार इत्यादी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी अजून आरोपींना अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिस दिली.पोलिसात मळद येथील पिढीत तरूणीने दिलेल्या फिर्यादीनुसार ती दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर 2016 साली पुढील शिक्षणासाठी कुरकुंभ येथील नातेवाईकांच्या घरी राहत असता त्यांच्याकडे नात्यातील एका तरूण नेहमी येत होता. या तरूणाने पिढीत तरूणीला तु मला खूप आवडते, तुझ्याशिवाय जगू शकतं नाही. लग्न करण्याचे वचन देऊन पिढीत तरूणी अल्पवयीन असल्यापासून तिला चारचाकी (एमएच. १२, एलडी. ०९९९ व एमएच. १४, ईएन. ४५९९ ) गाड्यांतून बारामती, टेंभुर्णी इत्यादी ठिकठिकाणी नेहून जबरदस्तीने वारंवार शरीर संबंध ठेवले.शरीर संबंधातून गर्भधारणा होऊ नये म्हणून वारंवार जबरदस्तीने गोळया खाऊ घातल्या. डॉक्टरकडे नेऊन तपासण्या केल्या. हे संबंध २०१६ ते 2022 पर्यंत चालू होते. पिढीत तरूणीने लग्ना करण्याची मागणी तरूणाकडे केल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. तरूणाच्या वडिलांनीही पिढीत तरूणीला तुमचे लग्न लावून देतो असे सांगितले होते. मात्र त्यानंतर वडिलांनीही लग्न लावून देण्यास नकार दिला. त्यानंतर पिढीत तरूणीने ८ मे २०२२ रोजी पोलिसांकडे धाव घेत यासंदर्भातील तक्रार दाखल केली. 

याप्रकरणी दौंड पोलिसांनी तरूण कुलदीप पांडूरंग कदम व त्याचे वडिल पांडूरंग कदम (दोघे रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींविरूध  गुन्हा दाखल होऊन १७ दिवस उलटूनही पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात आली नाही. गुन्हयाचा पुढील पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या