पुण्यातल्या कृषी महाविद्यालय इथं गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. तेव्हा त्यांनी तिथल्या सर्व गोठ्यांना भेट देऊन पाहणी केली. एका गोठ्यातल्या जमिनीचा स्तर समांतर नव्हता, काही ठिकाणचे बांबू तुटलेले होते. ते पाहून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं.
क्लिक करा आणि वाचा
ते म्हणाले, "अरे, काय केलंय, तुम्ही मला सांगा एवढा निधी लागतो, मी तुमच्या मागण्या पूर्ण करून देतो. तुम्ही अधिकाऱ्यांनी मला बोलावताना दहा वेळा विचार करा. मी तुमचा पंचनामा करेन की कौतुक करेन. माझा काठेवाडीचा आणि बारामतीचा गोठा येऊ बघा एकदा. आवड पाहिजे, आवड असल्याशिवाय काही होत नाही".गोठ्यांची पाहणी करताना अजित पवारांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. ते म्हणाले, "वर लाल कार्पेट आणि खाली जमिनीची लेव्हलही केली नाही. एखाद्या रानात चालतोय का काय असं वाटतंय. उगाच गोरंगोमटं होण्यासाठी काहीतरी करायचं, जरा बारामतीत या आणि काम कसं चालतंय ते बघा एकदा".
0 टिप्पण्या