बारामती शहरात कसबा याठिकाणी राष्ट्रवादी भवन समोरील रिंगरोडवर दुचाकीवरुन जात असलेल्या दांपत्यापैकी अपघातात ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव लैला शकील सय्यद (वय-४० या.मळद, बारामती) असे आहे.
क्लिक करा आणि वाचा
शकिल सय्यद हे आपली पत्नीयांच्याबरोबर दुचाकीवरून जात असताना अचानक अपघात झाला व ट्रकखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.सदर महिला ही मळद येथील रहिवासी असून आपल्या मुलाचाचा विवाह ठरल्यामुळे काही कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात घडून आला.त्यामुळे परिसरात अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच हळ-हळ पसरली आहे.
बारामती शहर पोलीस घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 टिप्पण्या