प्रतिनिधी :- दौंड
महाराष्ट्र राज्यातील त्रिदल सैनिक सेवा संघाचे गाव अध्यक्ष,तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.हे सर्व पदाधिकारी कार्यक्षम आहेत.तालुकाध्यक्ष यांनी गाव तेथे शाखा काढण्याची जबाबदारी घ्यायची आहे.गावामध्ये शाखा काढण्याचे काम आता तालुकाध्यक्ष हे करणार आहेत ही मोठी जबाबदारी व तालुक्याचा कारभार फक्त नि फक्त तालुकाध्यक्ष व तालुका कार्यकारणी करणार आहे.
जर तालुकाध्यक्ष यांना तालुक्यात काम करत असताना काही अडीअडचणी आल्यास त्या तालुक्यातील कोरकमिटीची टीम मदत करणार तरीही अडीअडचणी आल्यास जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी जावून प्रश्न सोडवण्यासाठी व मार्गी लावण्यासाठी एक कदम पुढे येतील.महाराष्ट्र राज्यातील तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष कार्यक्षम आहेत.येत्या सहा महिन्यात पुर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात शाखेचे भव्य व दिव्य उद्घाटन करून त्या तालुकाध्यक्ष यांना जबाबदारी देण्यात येणार आहे. तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आपल्या आपल्या तालुक्यात त्रिदल महिला शक्ती आघाडीची स्थापना करायची आहे.गाव अध्यक्ष,तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांची जबाबदारी वाढली आहे.
महाराष्ट्र राज्यातील गाव पदाधिकारी ते महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी महाराष्ट्र राज्य व कोणत्याही गावात व तालुक्यात व जिल्ह्यात शाखा काढू शकतात परंतु त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड व त्रिदल सैनिक सेवा संघाचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.अशोक चौधरी साहेब यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात येईल.
त्रिदल सैनिक सेवा संघाचे काम हे आहे की,महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र आणून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत करणे व सहकार्य करणे हे काम आहे.
0 टिप्पण्या