माजी सैनिक चंद्रकांत शेजुळ यांना अखेर त्रिदल सैनिक सेवा संघाचे प्रवक्ता एस.के.आठरे साहेब व नगर टीमने दिला न्याय.संदीप लगड...........!

प्रतिनिधी  :-  अहमदनगर 
अहमदनगर शहरात माजी सैनिक चंद्रकांत ज्ञानोबा शेजुळ यांच्यावर काही बालीका आश्रम रोजच्या परिसरातील काही नालायक निचवृत्तीच्या गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला होता.त्या गावगुंडांनवर तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.गावगुंडांनवर कारवाई न झाल्याने त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता मा.एस.के.आठरे साहेब व त्रिदल टीमने तोफखाना पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला.मोर्चा काढल्यावर तोफखाना पोलिस स्टेशनच्या कार्यक्षम अधिकारी मा.गडकरी मॅडम यांनी आरोपींना त्वरीत बोलावून घेतले व त्या आरोपींनवर कारवाई चालु आहे.तरी तोफखाना पोलिस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी यांनी सहकार्य केले व माजी सैनिकाला अखेर मिळाला न्याय.माजी सैनिकाला मारहाण झाल्याचे कळताच माजी सैनिकाच्या मदतीला धावून आली त्रिदल सैनिक सेवा संघ(मुख्यालय) महाराष्ट्र राज्य ही संघटना ही संघटना सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी धावून येते.या संघटनेचा विश्वास महाराष्ट्र राज्यातील सेवारत सैनिक,माजी सैनिक,शहिद वीर पत्नी,शहिद माता-पिता,अपंग सैनिक व सैनिक परिवाराच्या मदतीला छत्तीस जिल्ह्यात धावून जाते व त्रिदल सैनिक सेवा संघ ही संघटना महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यात आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला जाहिर आव्हान करण्यात येते की,काहीही अडचन आल्यास त्रिदल सैनिक सेवा संघाच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे जाहिर आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा संदीप लगड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या