अहमदनगर शहरात माजी सैनिक चंद्रकांत ज्ञानोबा शेजुळ रा.भिंगार यांना बालीका आश्रम रोड ज्ञानराज ॲकॅडमीत जावून अहमदनगर शहरातील काही गावगुंडप्रवृच्या लोकांनी मारहाण केल्याने.माजी सैनिक चंद्रकांत ज्ञानोबा शेजुळ यांनी तोफखाना पोलिस या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माजी सैनिक शेजुळ यांना त्रिदल सैनिक सेवा संघाशी संपर्क केल्याने तोफखाना पोलिस स्टेशनला त्रिदल सैनिक सेवा संघाची टीम पोहचली आहे.तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करूनही उद्याप पोलिस प्रशासनाने काही कारवाई न केल्याने त्रिदल सैनिक सेवा संघाचे पदाधिकारी यांनी पोलिस प्रशासनाचा जाहिर निषेध केला आहे.पोलिस प्रशासनाने त्वरीत कारवाई न केल्यास त्याच ठिकाणी अहमदनगर शहरातील सर्व सैनिक व सैनिक परिवार एकत्र येवून उपोषणाला बसणार असल्याची चर्चा चालु आहे.पोलिस प्रशासनाने गावगुंडांनवर काय कारवाई करणार का? कारवाई नाही झाल्यास त्रिदल मोठे आंदोलन उभा करणार परंतु या कडे अहमदनगर शहराचे लक्ष लागले आहे.
माजी सैनिक यांना मारहाण करूनही पोलिस प्रशासन गप्प का?पोलिस प्रशासनाने त्वरीत कारवाई न केल्यास त्याच ठिकाणी त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभा केले जाईल अशी माहिती त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या