बारामती तालुक्यातील विकास कामांचा आढावा व बैठक घेऊन झाल्यानंतर विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी पत्रकारांशी बोलत असताना,पत्रकारांशी बोलताना पत्रकारांनी राज ठाकरे यांनी शरद पवार हे बाळासाहेब ठाकरेंची आपल्या भाषणातून क्रेडिट ब्लिटी घालवत आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांवर भडकले हे तुमचे असले धंदे बंद करा. हे असे म्हंटले ते तसे म्हंटले त्यांबद्दल तुमचं मत काय जे म्हणायचे आहे ते त्यांनी म्हणावे.. आम्हाला विकासाबद्दल बोलायच आहे.तसेच अजितदादा म्हणाले की,मी काल पण जळगाव किंवा शहापूर असेल किंवा तिकडे डहाणू असेल किंवा ज्या ज्या भागात मी गेलेलो होतो तिथे माझी भूमिका ही विकास कामांचीच असेल..त्यामुळे तुम्ही पत्रकारांनी सुद्धा हे असले धंदे दाखवायचे बंद करा.. यावर अजितदादा हे पत्रकारांवर जोरदार भडकले आणि ज्यातून आपल्या महाराष्ट्रातील मुलांना मुलींना रोजगार निर्माण होणार आहे.त्याच्यातून जातीय सलोखा निर्माण होणार आहे. ज्याच्यातुन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याकरता पोलीस वर्गाला मदत होणार आहे ह्या गोष्टीला आपण जास्त म्हणत्व दिल पाहिजे.
जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पुन्हा इंधन दरवाढ वाढेल अशी वेळ केंद्राने आणू नये.........
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकारवर जनतेचा रोष वाढत असल्याने,केंद्र सरकारने दर कपात केली आहे.मात्र हे दर तसेच कमी राहावेत,अन्यथा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पुन्हा इंधन दर वाढवले असे होऊ नये एवढीच अपेक्षा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हटल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी बोलताना पवार म्हणाले, देशभरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर नाराजी होती.त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. मात्र असे असले तरी देखील हे दर अशीच कायम कमी राहावेत, अन्यथा पुन्हा त्याच स्थितीवर हे दर आले,तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही.पेट्रोल डिझेलचे दर हे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेले होते.राज्य सरकारने सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल गॅसचे दर परवडत नसल्याने कुठलाही टॅक्स न घेण्याचा निर्णय घेतला.इंधन दरवाढ गॅस दरवाढीसंदर्भात अनेक ठिकाणी आंदोलने झाली. यामुळे इंधन दरवाढ कमी केलेली असावी सुरुवातीला अगोदर पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवायच्या आणि नंतर कमी करायचा असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
तेलाच्या किमती वाढवण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला असल्याने,केंद्र सरकार या तेलाच्या किमती वाढवते किंवा कमी करते.सरकार कोणतेही आले असले तरी गोरगरीब जनतेला संसार चालवायला परवडले पाहिजे अशी परिस्थिती सरकारने निर्माण केली पाहिजे, असेही अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.राज्य सरकारने यापूर्वीच हे दर कमी केले आहेत राज्य सरकारने त्यांचा कर कमी करताना सर्वसामान्य माणूस टॅक्सी चालक वाहन चालक या सर्वांचा विचार केला आणि एक हजार कोटींचा बोजा सहन करत यापूर्वीच सीएनजीचा दर कमी केले मात्र हे दर पुन्हा वाढले असल्याचेही पवार यांनी सांगितले
0 टिप्पण्या