" पोलिसांवर हात उगारणं म्हणजे .. " कायदा सुव्यवस्थेच्या कानाखाली लगावण्यासारखं ; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल ... !"

मुंबई 
पोलिसांवर हात उचलणं म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या कानशिलात लगावण्यासारखं आहे . असं न्यायालयाने नमूद केलं आहे . मुंबई सत्र न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे . पोलिसांवर होणारे हल्ले हे कायदा सुव्यवस्थेवर झालेल्या हल्ल्यासारखे आहेत असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे . मुंबई सत्र न्यायालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार , २०११ साली सायन रेल्वे स्टेशनजवळ सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी दोन पोलीस गेले असता आरोपीने पोलिसांवर हात उगारलं , त्यांच्या कानशिलात लगावली . याप्रकरणी अनिल घोलप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता . गेल्या १० वर्षांपासून ही सुनावणी सुरू होती . आता अखेर या प्रकरणाचा निकाल लागला आहे .

दरम्यान , मुंबई सत्र न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवत आरोपीला चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ११ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या