प्रतिनिधी :- दौंड
"अमृत जवान सन्मान अभियान २०२२”
१००%यशस्वी करणेसाठी महाराष्ट्रातील सर्व सैनिकांना आणि संघटनेना विनंतीपूर्वक अव्हान.
महाराष्ट्रातील तमाम सैनिक व सैनिक परिवाराचे विनंतीपूर्वक लक्ष वेधण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १३/०४/२०२२ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ज्या माजी सैनिकांचे,शहीद जवानाचे विधवा भगिनींचे व सेवेत कार्यरत असलेल्या सैनिकांचे आणि
त्यांच्या कुटूंबियाच्या ज्या ही प्रलंबित तक्रारी आहेत त्या प्रलंबित तक्रारी कामांचा निपटारा जलद गतीने करण्यासाठी “अमृत जवान सन्मान अभियान २०२२” राबविण्याबाबतचे शासनाचे निर्देश आहेत.
सदर विषयाच्या अनुषंगाने गेल्या १० दिवसापासून महाराष्ट्र राज्य, त्रिदल सैनिक सेवा संघाचे पुणे जिल्हा सचिव श्री बाळासाहेब नवले आणि पुणे जिल्हा अध्यक्ष श्री शामराव धुमाळ आणि मी स्वत: राज्यध्याक्ष श्री संदीप लगड महाराष्ट्रातील सर्व सैनिक व त्यांच्या परीवाराला whatsapp मेसेज व्दारे अव्हान करीत आहे की, ज्या सैनिकांच्या वैक्तिक तक्रारी शासकीय कार्यालयाकडे प्रलंबित आहेत त्या सैनिकांनी सोबत जोडलेल्या पत्राच्या नमुन्यात आप आपल्या तक्रारी हया आपल्या तालुक्यातील मा.तहसीलदार कार्यालयाकडे तातडीने दाखल कराव्यात आणि दाखल केलेल्या तक्रारी पत्रावर तहसिलदार कार्यालयाची पोहोच घेवून त्या पत्राची छायाकिंत प्रत आपल्या तालुक्यातील सैनिक संघटनेच्या तालुका अध्यक्षांकडे जमा करावी अशी विनंती केली होती.
गेल्या १० दिवसापासून अमृत जवान सन्मान अभियाना बाबत करीत असलेल्या अव्हानास अनुसरुन महाराष्ट्रातील सैनिक मोठयाप्रमाणात जागृक होऊन या अभियानात पूर्ण सहभागी झाला आहे आणि अनेक सैनिकांनी आपल्या प्रलंबित तक्रारी आपल्या तालुक्यातील तहसिलदार कार्यालयाकडे दाखल केलेल्या आहेत तर अनेक सैनिक आपल्या प्रलंबित तक्रारी दाखल करीत आहे ही बाब निश्चित इतर सैनिकांसाठी प्रेरणादायी आहे.
तरी सर्वांना पुन्हा विनंतीपूर्वक अव्हान करीत आहे की अजूनही ज्या सैनिकांनी आपल्या प्रलंबित तक्रारी अदयाप आपल्या तालुक्यातील मा.तहसिलदार कार्यालयाकडे दाखल केलेल्या नाहीत त्यांनी तातडीने सोबत जोडलेल्या पत्राच्या नमुन्यात आपल्या प्रलंबित तक्रारी दाखल करुन पोहोच घेण्यात यावी आणि त्या पत्राची छायाकिंत प्रत आपल्या तालुक्यातील तालुका अध्यक्ष कार्यालयात जमा करावी ही नम्र विनंती.
तसेच महाराष्ट्रातील सर्व तालुका आणि जिल्हा संघटनेना सुद्दा विनंतीपूर्वक आव्हान आहे की, शासनाच्या निर्देशानुसार तालुकास्तरीय अमृत जवान सन्मान अभियान समिती आणि जिल्हास्तरीय अमृत जवान सन्मान अभियान समिती या दोन समित्या स्थापन करण्यात याव्यात आणि सदरच्या समितीमध्ये सैनिक संघटनेचा एक प्रतिनिधी सदस्य म्हणुन नियुक्ती करावी असे निर्देश आहे.
त्यामुळे प्रत्येक तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समितीत आपल्या सैनिकांच्या प्रलंबित तक्रारी सोडविण्यासाठी माजी सैनिक प्रतिनिधीची नियुक्ती करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्रातील सर्व तालुका व जिल्हा स्तरीय संघटनेना विनंती आहे की कृपाया सोबत जोडलेल्या पत्राच्या नमुन्यातील माहिती आपल्या संघटनेच्या लेटर हेड पत्रा द्वारे मा.उपिविभागीय अधिकारी आणि मा.जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकडे आपल्या संघटनेच्या माध्यामातुन अमृत जवान सन्मान अभियान समितीत नाव समावेश करण्यासाठी एक तज्ञ माजी सैनिकाचे नाव देण्यात यावे.जेणेकरुन सदर समिती मधील आपला सैनिक सदस्य आपल्या सैनिकांच्या प्रलंबित तक्रारीचे चांगल्या पध्दतीने निरसन करण्यासाठी सहकार्य करेल.तरी सर्व संघटनेनी महाराष्ट्रातील ज्या सैनिकांच्या तक्रारी अदयाप ही प्रलंबित आहेत अशा सैनिकांना सहकार्य करुन शासनाचे अमृत जवान सन्मान अभियान २०२३ हे १००% यशस्वी करु या.
धन्यवाद जय हिंद जय भारत.
आपला विनीत
श्री संदीप वामन लगड,
अध्यक्ष,
त्रिदल सैनिक सेवा संघ, महाराष्ट्र राज्य
0 टिप्पण्या