पत्नीच्या मैत्रीणी बरोबर ओळख वाढवून पतीने तिच्यावर बलात्कार केला. त्याचबरोबर तिची छायाचित्रे व व्हिडीओ समाजामाध्यमांमध्ये वायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे काढले . तसेच पतीच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे (वय २२), आशिष विजय कांबळे (वय२३, दोघेही रा. थिटे वस्ती, खराडी) अटक केलेल्यांची नावे असून. यांच्या विरोधात पिडीत तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ श्रीखंडे हा पिडीत तरुणीच्या मैत्रीणीचा पती आहे. त्याने समाजमाध्यमाद्वारे तरुणीला "तु मला खूप आवडते', अशा आशयाचा संदेश पाठविला होता. त्यानंतर त्याने फिर्यादीशी ओळख वाढवून तिला तो बाहेर फिरायला घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याने आपल्या मोबाईलमध्ये तरुणीची छायाचित्रे व व्हिडीओ काढले होते. त्यानंतर त्याने संबंधित व्हिडीओ व फोटो सोशल मीडियवर वायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून १७ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर सिद्धार्थचा मित्र आशिष यानेही तरुणीला धमकाविण्यास सुरुवात केली. आशिषनेही तरुणीवर बलात्कार केला. त्याने तरुणीला मारहाण करुन पैशांची मागणी केली. दोघांकडून होणाऱ्या या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांकडे फिर्याद दिली.
0 टिप्पण्या