प्रतिनिधी :- दौंड
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराने एकत्र येवून गावोगावी बचत गटाची स्थापना करण्याची गरज
आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यात शेकडो सैनिक संघटना आहेत त्या सर्व संघटना देश,समाज व सैनिक हितावर काम करत आहेत यामुळे आपल्या सर्व सैनिकांचा आपसी संपर्क वाढत आहे त्यांचे सर्व प्रश्न संघटनेच्या माध्यामातुन सुटत आहेत तसेच त्यांच्या मनामध्ये आपल्या हितावर जागृकता कायम रहाते.
परंतु आपल्या सैनिक महिला कडे आपले दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
शासनाच्या वतीने आपल्याला ज्या सुविधा लागू आहेत सदर विषयी त्यांना माहिती असणे आवश्यक आहे म्हणजेच आपल्या हयातीनंतर त्यांना अना आवश्यक बाबींचा सामना करावा लागणार नाही.
तसेच आपल्या महिला आर्थिक दृष्ट्या सुद्धा मजबूत झाल्या पाहिजेत यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजेच गावोगावी, तालुक्यात व जिल्ह्यात सैनिक महिला बचत गटाची स्थापना होय यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
बचत गटाची जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात नोंदणी साठी प्रमुख आवश्यक कागदपत्रे.
1). सैनिक ओळख पत्र
2). आपल्या पत्नीचे नाव असणार्या डिस्चार्ज बुक पानाची प्रत.
3). आधार व पॅन कार्ड प्रत.
4). प्रत्येकी पासपोर्ट साईज फोटो- 04
5). पीपीओ प्रत
6). आपल्या गावातील पंचायत कडुन रहिवासी व कुठे नोकरीस नाही असा दाखला
7). बचत गट स्थापना ठराव
8). बचत गट बँक खाते आपरेट करण्याचा सर्व सदस्य सहमती पत्र
9). बचत गटात एकूण 11 सदस्य आवश्यक त्यामध्ये तीन शहिद वीर पत्नी आवश्यक.
12). मिटिंग रजिस्टर मुद्दे सहीत.
13). वरील सर्व कागद पत्रांसोबत बचतगट लेटर हेड वर अध्यक्ष व सचिव सही सोबत नोंदणी साठी पत्र.
फायदे
1). संपर्क वाढतो
2). आपल्याला शासनाच्यावतीने लागु सर्व सुविधांची निःशुल्क माहीती मिळते
3). अर्थिक बळ मिळते
4). बचत गटाच्या माध्यमातून काही व्यवसाय करू शकतो तसेच सदर व्यवसायासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडुन रु. 10,00,000/- अनुदान मिळते.
5. व नियमा प्रमाणे इतर फायदे.
बचत गट स्थापने कामी काही अडचण आली सर संपर्क करू शकता.
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र आणण्यासाठी व सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून बचत गट गावोगावी काढण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना १००% वेळ देवू मदत करत आहे.तरी सैनिक व सैनिक परिवाराला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी गावागावातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र आणण्यासाठी व गाव तेथे त्रिदल सैनिक सेवा संघाची शाखा काढून त्याच दिवशी त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून गावात बचत गटाची स्थापना करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या