पुणे क्राईम न्यूज
चोरीच्या पैशातून अग्निशस्त्रे आणि महागडे मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. नितीन ऊर्फ दया विश्वास पोळ (वय ३३), साहील खंडू पेठे (वय २०, दोघे रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे) आणि सोने खरेदी करणारा रोहित संजय पंडित (वय ३७, रा. ससाणेनगर, माळीणबाई शाळेजवळ, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. साहिल पेठे याने विधिसंघर्षित बालकाच्या मदतीने वस्तीमध्ये दहशतीसाठी अग्निशस्त्र घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा
पोलिसांनी सांगितले की, रंगनाथ सदाशिव शिंदे (वय ५५, रा. साठेनगर, तरवडेवस्ती, महंमदवाडी, हडपसर, पुणे) यांच्या घरातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी महंमदवाडीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी नितीन ऊर्फ दया विश्वास पोळ यास पकडून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता, त्याने साहील खंडू पेठे याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचे सोने रोहित संजय पंडित या सोनाराने खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीकडून सहा लाख ४० हजार रुपये किमतीचे (१६० ग्रॅम) सोन्याचे दागिने, १९ हजार रुपये किमतीचा ओप्पो मोबाईल, जुन्या गाड्या दुरुस्तीसाठी वापरलेले ५० हजार रुपये किमतीची यामाहा मोटारसायकल व ८० हजार रुपये किमतिची होंडा अॅसेन्ट कार असा एकूण आठ लाख ३९ हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक गुन्हे) संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, सहायक पोलीस फौजदार संतोष तानवडे, पोलीस अंमलदार अमजद पठाण, संतोष नाईक, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड सर्फराज देशमुख, सचिन गवळी, सागर जगदाळे, शिरीष गोसावी, निळकंठ राठोड, अमित चिव्हे, गणेश खरात, दीपक भोईर, सिद्धेश्वर कसबे आणि महिला पोलीस शिपाई राणी खांदवे यांच्या पथकाने ही विशेष कामगिरी केली.
0 टिप्पण्या