प्रेम विवाह झालेल्या डॉक्टर पत्नीने जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर दौंड पोलिस ठाण्यात ॲट्रोसिटी गुन्हा दाखल ..!

दौंड
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या पत्नीला वारंवार जातीवाचक अपशब्द वापरूण शिवीगाळ आणि अपमानित केल्या प्रकरणी डॉक्टर पती , सासु , सासरा , दिर आणि जाऊ यांच्यावर ॲट्रोसिटी  कायद्या अंतर्गत दौंड पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली .  दौंड शहरातील हा प्रकार असुन वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या या दांपत्याकडुन झालेल्या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात  खळबळ उडाली आहे . सदानंद आप्पा धुमाळ , आप्पा लक्ष्मण धुमाळ , वत्सल्ला आप्पा धुमाळ ( सर्व गोपाळवाडी रोड , सरस्वती नगर , स्वप्नशिव अपार्टमेंट दौंड ) दयानंद आप्पा धुमाळ , सुनिता दयानंद धुमाळ ( दोघे रा . बेकनाळ ता . गडहींगलज , जि . कोल्हापुर ) अशी गुन्हा दाखल झालेली नावे आहेत.

क्लिक करा आणि वाचा

 याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत डॉक्टर व्यावसायिक असलेल्या महिलेचे सदानंद धुमाळ यांच्याशी प्रेमविवाह झाला आहे . मात्र पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय आल्याने पतीला विवाहबाहय संबंधांबद्दल विचारपूस केली असता पतीने उडवाउडवीची उत्तरे देवुन विषय टाळण्याचा प्रयत्न केला . अनोळखी महिलेबाबत असलेल्या विवाहबाहय संबंधाबाबतची माहीती पती लपवत असल्याने दोघांच्यात भांडणे झाली.भांडणामध्ये पतीने जातीवाचक अपशब्द वापरत तुझ्या सारख्या जातीच्या मुलीशी लग्न करून पस्तावलो आहे . तुझ्या समाजाची लायकी नसताना तुला मी पदरात घेतलं ती माझी चुक झाली. तुला समाजाचा जास्त माज आला आहे . तुझा समाज व तुझी आई व नातेवाईक माझे काहीएक वाकडे करू शकत नाहीत . माझेकडे भरपुर पैसा असुन तुझ्या सारख्या समाजाच्या मुली मी शरीर सबंध करण्याकरीता दररोज बदलेन असे अपशब्द वापरले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .

तसेच दिर दयानंद आप्पा धुमाळ व जाऊ सुनिता दयानंद धुमाळ या दोघांनीही वेळोवेळी जातीवर बोलुन अपमानीत केले , हॉलमध्ये टीव्ही पाहण्यास बसायचे नाही , डायनिंग टेबलवर बसायचे नाही , गाडी वापरायची नाही , हॉस्पीटलचे व्यवसायातील पैसे माझेकडे जमा केले पाहीजेत असे म्हणुन त्रास देत . पतीचे बाहेरील महिलेशी प्रेमसंबंध असल्याने हाताने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याची फिर्याद पिडीत डॉक्टर व्यावसायिक महिलेने दौंड पोलीस स्टेशनला दिल्याने पतीसह पाच जणांवर ॲट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या घटनेचा अधिक तपास दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या