पुणे- जेजुरी
मोबाईलवर अश्लील व्हिडीयो दाखवून ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असल्याची घटना २०१८ मध्ये जेजूरीत घडली होती. त्या नरधमाला न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरी आणि ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पवन राज कुडाळकर असं २४ वर्षीय नराधमाचं नाव आहे.
क्लिक करा आणि वाचा
हि सर्व घडना ७ मे २०१८ रोजी जेजुरीत घडली होती. पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर लगेच आईने जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपी कुडाळकर मुलीला खाऊचं अमिष दाखवून घरात घेऊन गेला. त्यानंतर ९ वर्षांच्या मुलीला अश्लील व्हिडीयो बघण्यास भाग पाडलं आणि तिच्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
मागील दोन वर्ष या प्रकरणाची चौकशी सुरु असताना त्या चौकशीसाठी डीएनए चाचणी करण्यात आली होती. सदर चाचणीचा अहवाल पॉसिटीव्ह आला आणि पीडित मुलीने नराधमाविरोधात साक्ष दिली.या दोन्ही पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा निकाल लागला.हे संपुर्ण प्रकरण विशेष सरकारी वकील अरुंधती रासकर यांनी हाताळले. या प्रकरणात सुरुवातील अनेकांवर संशय व्यक्त केला मात्र शेवट १३ साक्षीदारांची तपासणी केली. त्यानंतर पवन राज कुडाळकर डीएनए चाचणीच्या पुराव्याने आरोपी स्पष्ट झाला. पीडित मुलीने देखील या प्रकरणी साक्ष दिली होती. त्यानुसार कुडाळकर या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी आणि ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
0 टिप्पण्या