20 हजाराची लाच घेताना API धनंजय गंगणे ACB च्या जाळ्यात....!

कंपनीमध्ये अपघातात  कामगाराचा मृत्यू  झाल्याप्रकरणी कंपनीवर हलगर्जीपणा केल्याचा आरोपावरून  हिल लाईन पोलीस ठाण्याचे  सहायक पोलीस निरीक्षक धनंजय गंगणे  यांनी २५ हजार रुपयांची लाच मागणी केली होती.. गुरुवारी दुपारी तक्रारदार महिलेने तडजोड करुन २० हजार रुपये गंगणे यांना दिले असता महिलेकडून लाच स्विकारताच ठाणे ACB ने गंगणे यांना रंगेहात पकडले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई नेवाळी पोलीस चौकीत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या उसाटणे येथील एका कंपनीत काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला त्यानंतर या कंपनीवर पोलीस प्रशासनाने हलगर्जीपणाचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.

कंपनीच्या व्यवस्थापनाने गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांना पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय गंगणे हे महिलेकडून 20 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्विकारताना ACB घ्या जाळ्यात अडकले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या