रायगड पोलिसांनी बोटीतून ३ एके-४७ रायफल केल्या जप्त तर परिसरात हाय अलर्ट घोषित ....!

रायगड पोलिसांनी बोटीतून ३ एके-४७ रायफल केल्या जप्त तर परिसरात हाय अलर्ट घोषित.........! 


रायगड 
 रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर पोलिसांनी एका संशयित बोटीतून तीन एके-47 रायफल काडतूस  कागदपत्रे जप्त केले आहेत. खबरदारी म्हणून पोलिसांनी रायगडमध्ये हाय अलर्ट घोषित केला आहे. तसेच सर्च ऑपरेशन देखील सुरू करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनूसार, गुरूवारी सकाळी रायगड पोलीस  गस्त घालत असताना हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर ही संशयित बोट आढळून आली. बोटीची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये तीन एके-४७ रायफल, काडतूस, कागदपत्रे इत्यादी मिळून आले. पोलिसांनी तात्काळ सर्च ऑपरेशन सुरू केले तसेच खबरदारी म्हणून जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित केला. बोटीवर कोणी संशयित व्यक्ती दिसले होते का याची चौकशी पोलीस स्थानिकांकडे करत आहेत. तसेच महाराष्ट्र एटीएसचे  एक पथक रायगडला पोहचले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अनोळखी वस्तू व्यक्तीबाबत तातडीने पोलीस व जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी, असं आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केलं आहे. विधानपरिषदेत उपस्थित केला मुद्दादरम्यान, अनिकेत तटकरे यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला.यासंदर्भात त्यांनी सांगितले की, गुरूवारी सकाळी ही बोट सापडली असून यामध्ये तीन एके-४७, अनेक कागदपत्रे, २५० जिवंत काडतूसे सापडली आहेत.रायगडच्या किनाऱ्यावर अशा प्रकारे शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय गंभीर आहे.या संपूर्ण घटनेची तपास यंत्रणांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी रायगडचे खासदार सुनिल तटकरेंनी केली आहे.1993 मध्येही समुद्र किनारी अशी बोट आढळून आली होती. त्यानंतर पुढे काय झालं याची सगळ्यांना कल्पना आहे.त्यामुळे या बोटीचा तपास व्हायला हवा. राज्य आणि केंद्र सरकारनं यंत्रणांच्या माध्यमातून याचा तपास करायला हवा, असं तटकरे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या