बारामतीत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा...!



बारामतीत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा...!


बारामती : 
कोविडच्या संकटानंतर यंदा प्रथमच बारामतीकरांनी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला . गोविंदाचा उत्साह आणि मंडळानी केलेली  तयारी यामुळे  बारामतीची दहीहंडी प्रेक्षणीय ठरली. यंदा गोविंदांसह प्रेक्षकांचीही संख्या ही मोठ्या प्रमाणावर होती. तीन हत्ती चौकातील मानाच्या स्व. धनंजय भाऊ देशमुख मेमोरियल ट्रस्टद्वारे आयोजित नगरसेवक जयसिंग बबलू देशमुख मित्र परिवाराची दहीहंडी आमराईतील अभिनव दहीहंडी संघाने सहा थर रचत फोडली. त्यांना 56 हजारांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

माजी नगरसेवक  इंगुले यांनी भिगवन चौकात लावलेल्या युनिटी फ्रेंडस क्लबची दहीहंडी बारामतीच्याच आमराईतील जय हनुमान दहीहंडी संघाने फोडली. त्यांना 21 हजारांचे पारितोषिक देण्यात आले. करण इंगुले यांच्या खाटिक गल्ली तालिम संघ आयोजित राष्ट्रवादी चषकाची दहीहंडी यंदा योगेश भैय्या जगताप दहीहंडी संघाने सहा थर रचत फोडली. त्यांना 21 हजारांचे पारितोषिक दिले गेले.कसब्यातील श्री काशिविश्वेश्वर दहीहंडी मंडळाची दहीहंडी काशिविश्वेश्वर संघाने फोडली. अशोकनगर चौकातील अँड. विनोद जावळे यांच्या राज प्रतिष्ठानची दहीहंडी गुनवडीच्या जय भवानी दहीहंडी संघाने पाच थर रचून फोडली. भिगवण चौकातील ऋतुराज काळे व चंद्रशेखर काळे यांच्या वस्ताद बाजीराव काळे दहीहंडी संघाची दहीहंडी उत्तम धोत्रे यांच्या जय हनुमान दहीहंडी संघाने संघाने फोडली. क्रांतीसिंह विश्वनाथ दादा गालिंदे चौकातील  दहीहंडी आमराईतील विघ्नहर्ता दहीहंडी संघाने पाच थर रचून फोडली. त्यांना 25 हजारांचे बक्षीस दिले गेले. माजी नगरसेवक अभिजीत काळे यांच्या अजितदादा युवा शक्ती दहीहंडी मंडळाची दहीहंडी उभारली होती, मात्र एक दुःखद घटना घडल्याने ही दहीहंडी फोडण्यात आली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अँड. सुधीर पाटसकर यांच्या एकलव्य चषक दहीहंडी संघाची दहीहंडी भोईराज दहीहंडी मंडळाने फोडली. या प्रसंगी कालीपुत्र कालिचरण महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. 

हा उत्सव साजरा होत असताना बारामतीमध्ये काही गोंधळ होऊ नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरिक्षक सुनील महाडीक व महेश ढवाण आणि इतर अधिका-यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या