अहमदनगर शहरात गल्ली-गल्लीत,चौका-चौकात शाखा काढण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाची जोरदार सुरूवात.संदीप लगड ................!


प्रतिनिधी  :- अहमदनगर 
सैनिक आपल्या दारी अभियानात अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून अहमदनगर शहरात गल्ली-गल्लीत,चौका-चौकात शाखा काढण्यासाठी वार रविवार दिनांक ०४/०९/२०२२ रोजी ठिक ०२:०० वाजता मौजे वैद्य काॅलनी या ठिकाणी भव्य दिव्य उध्दघाटन सोहळा मोठ्या उत्साहाने व जल्लोषत पार पडला.अहमदनगर शहरातील व अहमदनगर ग्रामीण भागातील सर्व त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिलेल्या पदाधिकारी साहेबांचा ओळख नसल्याकारणे ज्या जेष्ठ मार्गदर्शक व गुरूवर्य साहेबांचा सत्कार चुकून राहिला असेल व नाव उल्लेख राहिला असेल त्या सर्व पदाधिकारी साहेबांचा सत्कार त्यांच्या तालुक्यात जावून त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड करणार आहेत.अहमदनगर शहरातील गल्ली-गल्लीत व चौका-चौकात शाखा काढण्यासाठी व अहमदनगर शहरातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र करण्यासाठी व सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून  ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे असे आमचे जेष्ठ मार्गदर्शक व गुरूवर्य,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष आदरणीय मा.श्री.अकुंशजी खोटे साहेब यांनी दोनच दिवसात वैद्य काॅलनीतील मार्गदर्शक व गुरूवर्य साहेबांशी संपर्क साधून कार्यक्रमाचे नियोजन पार पाडल्याने मा.श्री.अंकुशजी खोटे साहेब यांचे महाराष्ट्र राज्यातून सैनिक व सैनिक परिवाराच्या वतीने कौतुक होत आहे.अहमदनगर शहरातील वैद्य काॅलनीतील सर्व जेष्ठ मार्गदर्शक व गुरूवर्य साहेब व त्रिदल सैनिक सेवा संघाचे पदाधिकारी साहेबांनी रात्रीचे दिवस करून शाखेचे उध्दघाटन सोहळा पार पाडल्याने त्या सर्व मार्गदर्शक व गुरूवर्य साहेबांचे त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संदीप(भाऊ)लगड यांनी आभार मानले.ज्या पध्दतीने वैद्य काॅलनीतील मार्गदर्शक व गुरूवर्य साहेबांचा आदर्श घेवूनच अहमदनगर शहरात त्याच पध्दतीने दिव्य व भव्य उध्दघाटन करण्यात येणार आहे.अहमदनगर शहरात शाखा काढण्यासाठी जेष्ठ मार्गदर्शक व गुरूवर्य साहेबांची निवड करण्यात आली आहे.त्या मार्गदर्शक व गुरूवर्य साहेबांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष आदरणीय मा.श्री.अंकुशजी खोटे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघटना उत्तर महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मा.श्री.नवनाथ मोहिते साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघटना बीड जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.नवनाथ भगत साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघटना अहमदनगर शहर अध्यक्ष मा.प्रकाश परकाळे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघटना अहमदनगर मुख्यालयाचे अध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब आंधळे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघटना अहमदनगर मुख्यालयाचे उपाध्यक्ष मा.श्री.हरिभाऊ चिरके साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघटना अहमदनगर मुख्यालयाचे सचिव मा.श्री.सतिश घुमरे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघटणा अहमदनगर मुख्यालयाचे कोषाध्यक्ष मा.श्री.रामदासजी पावले साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघटना अहमदनगर मुख्यालयाचे मिडिया प्रमुख मा.श्री.समाधान शिंदे साहेब यांची निवड करण्यात आली आहे.या टीममध्ये अनेक पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार आहे.त्रिदल सैनिक सेवा संघटनेत पदाधिकारी यांची निवड करताना वेळ लागुद्या पण पदाधिकारी यांची निवड योग्यच केली जाईल अशी प्रतिक्रिया त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष मा.श्री.अंकुशजी खोटे साहेब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचा प्रवक्ता कसा असावा त्यांचे विचार कसे असावे हे आपल्याला सर्व महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला दाखविण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता मा.श्री.विक्रमजी जगताप साहेबांनी सैनिकांच्या चारित्र्यावर दोन तास प्रवचन केले.अहमदनगर शहरातून अनेक फोन आले की,प्रवक्ता असावा तर मा.जगताप साहेबांन सारखा असावा.त्रिदल सैनिक सेवा संघटनेच्या पदाधिकारी साहेबांना जाहिर आव्हान करतो की,सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासन व शासनाची मदत घेवूनच कामे केली जाणार आहेत.अहमदनगर शहरात शाखा काढण्यासाठी अनेक मार्गदर्शक व गुरूवर्य साहेबांचे फोन आले आहेत येत्या सहाच महिन्यात अहमदनगर शहरात ७५ शाखा त्रिदल माजी सैनिक सेवा संघ याच नावाने अहमदनगर धरमादायी आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन केले जाणार आहे.

या कार्यक्रमाला राजकिय क्षेत्रातील,सामाजिक क्षेत्रातील व महाराष्ट्र राज्यातून त्रिदल सैनिक सेवा संघाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहिले त्याचे सर्वांचे आभार त्रिदल सैनिक सेवा संघाचे कोरकमिटीचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मा.श्री.राजेंद्र कापरे साहेब व त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक मा.श्री.प्रशांत धुमाळ साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हा कोरकमिटीचे अध्यक्ष मा.श्री.सरदार साहेब व त्रिदल सैनिक सेवा संघटनचे आरोग्य अहमदनगर जिल्हाध्यक्ष मा.श्री.युनूस टेंगे यांनी आभार मानले.
     
  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या