मांडवे येथे वाळू माफीयांचा सुळसुळाट महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

मांडवे येथे वाळू माफीयांचा सुळसुळाट महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

अन्यथा माहिती सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन रणदिवे करणार जिल्हाधिकारी कार्यालय समोर तीव्र स्वरूपात आंदोलन


मौजे मांडवे येथे गेल्या कित्येक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात स्थानिक अधिकारी यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा जोमात सुरू आहे माळशिरस तालुक्याचे कार्यक्षम तहसीलदार जगदीश निंबाळकर हे सक्तीच्या रजेवर गेल्यापासून माळशिरस तालुक्यात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे मांडवे येथील स्मशानभूमी नजिक ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा रात्रभर जोमाने सुरू आहे याकडे स्थानिक पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी लक्ष देण्याची गरज भासत आहे. ज्या ठिकाणी वाळू उपसा करण्यात आला आहे त्या ठिकाणचा स्थळदर्शक पंचनामा करून योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच वाळू माफियांच्या मुस्क्या लवकरात लवकर आवळण्यात याव्यात अन्यथा माहिती सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवे येथील अनधिकृत सुरू असलेल्या वाळू उपशाचे स्थळदर्शक पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे वाळू माफियांनी जेसीबी ट्रॅक्टर च्या साह्याने वाळू उपसा केला आहे ती वाहने त्वरित जप्त करण्यात यावीत या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कर्तव्यदक्ष मिलिंद शंभरकर साहेब व पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचे माहिती सेवाभावी संस्थेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन रणदिवे यांनी बोलताना सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या