प्रतिनिधी :- दौंड
महाराष्ट्र राज्यातील सर्व माजी सैनिक ,शहिद वीर पत्नी ,शहिद वीर माता-पिता,अपंग सैनिक व माजी सैनिक विधवांना आवाहन करण्यात येते की, वन रँक वन पेन्शन साठी जे माजी सैनिक दिल्लीमध्ये जंतर-मंतर वरती गेले पंन्नास दिवस झाले आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत. त्या माजी सैनिकांना आपल्या त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी वन रँक वन पेन्शन साठी महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष साहेबांनी आपल्या तालुक्यातील त्रिदल सैनिक सेवा संघाचे तालुकाध्यक्ष यांनी आपल्या तालुक्यातील सर्व संटनेला व तालुक्यातील शहिद वीर पत्नी,शहिद वीर माता- पिता,अपंग सैनिक,माजी सैनिक,माजी सैनिक विधवांना एकत्र करून आपण सर्व तालुकाध्यक्ष यांनी आपल्या जिल्ह्यातील त्रिदल सैनिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष यांना सहकार्य करून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात येणार आहे जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी त्रिदल संघटनेच्या तालुक्यातील टीम सोबत दिनांक ०३/०४/ २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर राहावे ही आपल्या हक्काची लढाई सर्व संघटना मिळून सर्व सैनिक एकत्र आहोत हे दाखवण्याचा व सैनिकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे तरी सर्वांनी वेळात वेळ काढून कलेक्टर साहेबांच्या ऑफिस समोर०३/०४/२०२३ रोजी सकाळी बरोबर ११.०० वाजता कलेक्टर ऑफिस समोर उपस्थित राहावे असे जाहिर आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराने आपल्या गावातील सैनिक व सैनिक परिवाराच्या घरी जावून हा मॅसेज पोहचवण्याचे काम केलेच पाहिजे.ही जबाबदारी महाराष्ट्र राज्यातील त्रिदल सैनिक सेवा संघाच्या पदाधिकारी साहेबांना दिली आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराने जिल्हाधिकारी कार्यालयात जाताना आर्धा तास अगोदर निघा व गाडी चालवताना स्वत:हाची काळजी घेतली पाहिजे.तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर घरी जाताना व्यवस्थित जायचे आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात गाडी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.सर्व सैनिक व सैनिक परिवाराने एकाच जाग्यावर गाड्या पार्किंग कराव्यात.महाराष्ट्र राज्यातील गाव लेवल,तालुका लेवल,जिल्हा लेवल सर्व सैनिक संघटना एकत्र येणार आहेत.तरी सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांनी मिळून आपल्या जिल्ह्यातील मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायचे आहे.तरी आपली ताकद दाखवून देण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सैनिक व सैनिक परिवाराने एकत्र आलेच पाहिजे असे जाहिर आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.जे.के.कटके यांनी केले आहे.
0 टिप्पण्या