नातेपुते ग्रामीण रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ, परिसरातही फुलझाडे लावून सुशोभीकरण करणार : राजकुमार हिवरकर पाटील

नातेपुते ग्रामीण रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ, परिसरातही फुलझाडे लावून सुशोभीकरण करणार : राजकुमार हिवरकर पाटील


नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णालयाला संरक्षण भिंत अभावे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते त्या अडचणींची प्रतीक्षा थांबली असून शिवसेनेचे माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व पाठपुरावा करून नातेपुते ग्रामीण रुग्णालयासाठी संरक्षण भिंतीसाठी प्रस्ताव करून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी केली असता त्या मागणीस तात्काळ मंजूरी मिळाली असून नातेपुते येथील गिरजापती श्री शंभू महादेवाचा लग्न सोहळा याचे औचित्य साधून नातेपुते ग्रामीण रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीचे कामाचे भूमिपूजन नातेपुते ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता व्होरा, डॉ. किरण पोटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नातेपुते शहर उपप्रमुख पोपटराव शिंदे, फोंडशिरस प्रमुख संतोष गोरे, नातेपुते शहरगटनेते दादा मुलांनी, प्रभाग १६ चे प्रमुख राजू मुलांनी, भारतीय जनता पार्टीचे सतीश बरडकर, अथर्व राजकर, प्रभाग क्रमांक ११ चे प्रमुख सनी बरडकर, प्रभाग क्रमांक १३ चे प्रमुख सोनू लांडगे, नातेपुते शहर उपप्रमुख अक्षय सोरटे, भाजपचे नेते मनोज जाधव, तेजस गोरे ग्रामीण रुग्णालयाचे आजी मा शेख संतोष नडे व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील बोलत असताना म्हणाले की, नातेपुते व नातेपुते परिसरातील गोरगरीब जनतेला येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवा चांगली मिळावी. त्यांचे सर्व निदान या रुग्णालयात व्हावे यासाठी वेळोवेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्याकडे पाठपुरावा करून रुग्णालयासाठी अनेक रक्तातील घटक तपासण्यासाठी मशीन,सेलकॉन्टर मशिन, तसेच सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका नातेपुते ग्रामीण रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिल्या. येथील रुग्णालयात ज्या ज्या त्रुटी आहेत कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहेत त्या जाणून घेऊन त्याचाही लवकर पाठपुरावा करून त्या त्रुटी अडचणी दूर करू रुग्णालयात येणारा रुग्ण रुग्णालयाचा परिसर पाहून प्रसन्न व्हावा यासाठी परिसरात कुंड्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या फुलांची झाडे लावून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच माळशिरस तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना चांगली सुविधा मिळण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे मत यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीच्या भूमिपूजन करते वेळी व्यक्त केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या