प्रतिनिधी-माळशिरस सचिन रणदिवे
कोंडबावी (ता.माळशिरस) येथील विद्यमान ग्रा.पं. सदस्य विजय शिंदे यांनी सरपंच व इतर सत्ताधारी सदस्यांना ग्रामसभा, मासिक सभा यामध्ये गावातली नागरीकांच्या अडीअडचणीबाबत प्रश्न उपस्थित केले, तसेच पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन न्यायालयामध्ये सुरु असणारा दावा काढून घ्यावा, या करीता सरपंच महिलेचे पती, भाऊ यांनी संगनमत करुन शिंदे यांच्या शेतात घुसखोरी करुन जबर मारहाण केली, याबाबत अकलूज पोलीस ठाणे येथे तक्रार देण्याकरीता शिंदे गेले असता, तेथे उपस्थित असणारे ठाणे अंमलदार यांनी रक्तबंभाळ असणारे शिंदे यांना गुन्हा दाखल करु नये असे सांगितले. मात्र गुन्हा नोंद करुन घ्यावा यावर ठाम राहिल्याने, वैद्यकिय तपासणी करण्याकरीता शिंदे यांना पाठवून दिले. पोलीस कर्मचारी मिरगणे यांनी कोंडबावी गावचे सत्ताधारी लोक यांना कॉल करुन सदर माहिती पुरविली व पोलीस ठाण्यात बोलावून घेतले यानंतर शिंदे यांचा गुन्हा नोंद करुन घेण्यात आला. मात्र त्यानंतर मिरगणे यांनी सत्ताधारी लोक यांच्याशी संगनमत करुन अकलूज पोलीस ठाणे येथे बोगस गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा नोंद क्र. १७९/२०२३ हा गुन्हा ग्रा.पं. सदस्य शिंदे यांच्यावर व परगावी असणारे त्यांचे चुलत भाऊ यांच्यावर बोगसरित्या गुन्हा दाखल केला, या गुन्हयात समाविष्ठ केलेले लोक परगावी असल्याबाबतची सी.सी. टीव्ही व्हिडीओ असूनही जाणीवपुर्वक राजकीय दबावापोटी अकलूज पोलीस कर्मचारी यांनी सदराचा गुन्हा नोंद केला. यानंतर शिंदे यांना दि. २८.३.२०२३ रोजी पोलीस कर्मचारी यांनी अटक केली व राजकीय दबावापोटी तसेच स्वत:च्या गैरकृत्य दडपण्यासाठी पोलीस ठाण्यात अटकेमध्ये असताना जबर मारहाण करण्यात आली. याबाबत शिंदे यांना मा. न्यायालय माळशिरस येथे हजर केले असता, मारहाणीबाबत तोंडी तक्रार न्यायालयात करण्यात आली. तसेच शिंदे यांचे वकील अॅड. वैभव धाईंजे यांनी मारहाणी विरोधात जोरदार युक्तीवाद केला, याची गंभीर दखल घेवून मा. न्यायालयाने मारहाणीची स्वत: पहाणी करुन वैद्यकिय अधिकारी माळशिरस यांना सविस्तर अहवाल सादर करण्याबाबत आदेश देण्यात आला. यानुसार वैद्यकिय अधिकारी यांनी सविस्तर तपासणी करुन मारहाणीबाबतचा अहवाल मा. न्यायालय यांच्याकडे सादर केला, सदर वैद्यकिय अहवालाची अवलोकन केले असता पोलीस कोठडीत असणारे शिंदे यांना ६ ते ७ पोलीसांनी मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. या मारहाणीची मा. न्यायालयाने गंभीर दखल घेवून सविस्तर अहवाल मा. सत्र न्यायाधिश साहेब जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांना पुढील कारवाई करीता सादर करण्यात आला आहे.
बोगस गुन्हा दाखल करुन त्या आरोपाखाली आरोपीस अटक करुन कोठडीमध्ये सामुहिक मारहाण करणारे व खोटा गुन्हा दाखल करणारे पोलीस कर्मचारी यांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर पोलीस
अधिक्षक सोलापूर, पोलीस महानिरिक्षक कोल्हापूर, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी कडक कारवाई करण्यात यावी अशी नागरीकांमध्ये चर्चा आहे.
चौकट :-
काही पोलीस कर्मचारी कायद्याचे उल्लंघन करुन स्वत:चे दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी कोठडीतील आरोपींना जबर मारहाण करणे, नागरीकांना वेठीस धरणे, बेकायदेशीर पोलीस बंदोबस्त पुरविणे इ. गैरप्रकार करीत आहेत. कायद्याने दिलेल्या अधिकाराचे गैरवापर होवूनही दोषी पोलीस कर्मचारी विरोधात नागरिक घाबरुन तक्रार दाखल करीत नाहीत. गैरकृत्य करणारे काही पोलीस कर्मचारी यांच्यामुळे प्रामाणिकपणे काम करणारे पोलीस देखील नाहक बदनाम होत आहेत. दोषी पोलीस कर्मचारी यांच्या बाबतचे पुरावे ग्राहय धरुन वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. दोषी कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करणे व इतर कठोर कारवाई झाल्यास पोलीस प्रशासन यांची प्रतिमा जनसामान्यात विश्वासक निर्माण होईल. पिडीत नागरीकांना न्याय मिळावा या करीता लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर " आत्मक्लेश” आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.
श्री.रमेश रा. गोफणे- पाटील.
(महिती अधिकार कार्यकर्ता तथा संस्थापक, नवभारत प्रतिष्ठान.)
चौकट:-
अकलूज पोलीस ठाणे येथे कलम ३२७ व इतर प्रमाणे शिंदे यांचेवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरील गुन्हयाचे कामे आरोपी यांना मे. न्यायालयासमोर रिमांड कामी दि. २९.३.२०२३ रोजी हजर केले असता, आरोपी यांना पोलीसांकडून जबर मारहाण झाल्याची तक्रार मे. न्यायालयाकडे करण्यात आली. तेंव्हा घडल्या गैरप्रकाराची गंभीर दखल मे. न्यायालय यांनी घेवून आरोपी यांची वैद्यकिय तपासणी करण्याचे आदेश पारीत केले. तेंव्हा वैद्यकिय अहवालामध्ये आरोपीस मारहाण झाल्याचे निष्पन्न झाल्याने मे. दिवाणी न्यायाधीश ए.व्ही.देशपांडे साहेब यांनी घडल्या घटनेची गंभीर दखल घेवून दोषींवर पुढील कायदेशीर कारवाई करणेकामी अहवाल मे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेब सोलापूर यांना पाठविला आहे. सदरील प्रकरणामध्ये पोलीसांनी गुन्हयाच्या तपासकामी ५ दिवसांची पोलीस कोठडी मागणी केली होती, तो अर्ज मे. न्यायालयाने नामंजुर करण्यात आला व आरोपीस जामीन अर्ज यावर युक्तीवाद होवून सदर आरोपीस जामीन मंजुर करण्यात आला व मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे तंतोतंत पालन करण्याचे कडक शब्दात अकलूज पोलीस ठाणे यांना आदेश दिले.
अॅड. वैभव सु. धाईंजे, (आरोपीचे वकील)
0 टिप्पण्या