अन्न औषध प्रशासन विभाग आणि पोलीस बघ्याची भूमिका घेणार की,कारवाई करणार ?
प्रतिनिधी : अकलूज : अकलूजमधील जीवघेणा चालू असलेला मावा,१२/३०० सुगंधी तंबाखू,गुटखा विक्री,मटका,जुगार हे अवैद्य धंदे तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी अन्न औषध प्रशासन विभाग सोलापूर यांच्या आणि अकलूजमधील पोलीस प्रशासनाच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे ६ एप्रिल रोजी अकलूजमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे माळशिरस तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे यांनी दिली.तसेच अन्न औषध प्रशासन विभाग आणि उपविभागीय पोलिस अधीक्षक अकलूज यांना निवेदन दिल्याचेही सांगितले.
अकलूज मधील शिवशंकर बझार,स.मा.वी.शाळा,स.मा.वी.प्राथमिक शाळेच्या समोर तसेच उर्वरित अकलूजमधील विविध भागातील पान टपरी,आणि यशवंतनगर मधील पान टपरी वरती अवैद्य पणे १२०/३०० सुगंधी तंबाखू,मावा,गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर चालू असून त्याचबरोबर,मटका जुगार,हे अवैद्य धंदे जोरात चालू आहेत.या धंद्याच्या माध्यमातून अन्न औषध प्रशासन विभागाला आणि पोलीस विभागाला लाखो रुपयांचा हप्ता दिला जात असल्याची चर्चा अकलूज परिसरातील जनतेमध्ये चालू असून या अवैद्य मावा गुटखा विक्री केल्याने शाळेमध्ये जाणाऱ्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या लहान वयातील मुलांना या जीवघेण्या व्यसनाची सवय लागल्याने त्याचं आयुष्य धोक्यामध्ये आले असून लहान मुलांना गुटका,मावा,सुगंधित तंबाखूच्या अतिसेवनाने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गुटखा,मावा,१२०/३०० सुगंधी तंबाखू,या अवैद्य धंद्याचा सुळसुळाट चालू आहे. संपूर्ण अकलूज शहरामध्ये असलेल्या पान टपरी तसेच यशवंत नगर मध्ये असलेल्या पान टपरी वरती चालू असून अन्न औषध प्रशासन विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत मावा ,गुटखा याला बंदी असताना अन्न औषध प्रशासन विभाग उघड्या डोळ्यांनी पाहत असून अवैद्य धंदे बंद करण्यासाठी पुढे सरसावत नाहीत ही शोकांतिकाची गोष्ट आहे.त्यामुळे अकलूज मधील शिवशंकर बाजार,प्रतापसिंह चौक लहान मुलांची प्राथमिक शाळा समावी समोरच्या गाळ्यामध्ये तसेच अनेक पान टपरी वरती हा जीवघेणा प्रकार चालत असून हा जीवघेणा प्रकार तात्काळ न थांबल्यास आणि अकलूजमधील जुगार, मटका तात्काळ बंद न केल्यास अकलूज शहराची जबाबदारी असणाऱ्या अधिकारी यांनी हे धंदे तात्काळ कायमचे बंध न केल्यास त्यांच्यावर ती कारवाई करून हे धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत या मागणीसाठी अकलूजमध्ये ६/४/२०२३ रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असल्याचा काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे माळशिरस तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे यांनी अन्न औषध प्रशासन विभाग आणि पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे.
0 टिप्पण्या