प्रतिनिधी-माळशिरस
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माळशिरस सेतू कार्यालय बंद करण्यात आल्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. मात्र सेतू कार्यालय बंद करू नये अशी आमच्या संघटनेची ठाम मागणी असून माळशिरस सेतू कार्यालय पुन्हा सुरू करावे या मागणीचे निवेदन सोबत देत आहोत
दहावी बारावीची परीक्षा संपल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थी वेगवेगळे दाखला मिळण्यासाठी सेतू कार्यालयात गर्दी करतात सेतू कार्यालय बंद केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. सेतू कार्यालयात जो दाखला शासन निर्णय नुसार मिळत होता त्यासाठी महा-ई-सेवा केंद्रामध्ये किमान 150 ते 200 रुपये मोजावे लागतील. याशिवाय महा-ई-सेवा केंद्रातून यापूर्वी चुकीची काम झालेले अनुभव आहेत. यामुळे भ्रष्टाचारासाठी वाव मिळणार आहे एका केस मध्ये महा-ई सेवा केंद्रातून बोगस अफिडेविट करून एका वृद्ध महिलेच्या अकाउंट वरचे दोन कोटी रुपये काढून घेतले होते. या प्रकरणात उत्तर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीमती. राऊत गोळे मॅडम त्यांना काही दिवस जेलमध्ये राहावे लागले. त्याचबरोबर जिल्ह्यातील 11 सेतू कार्यालय बंद झाल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. बेरोजगारीमुळे त्यांनी जीवाचे बरे वाईट केल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा आम्ही देत आहोत.
याशिवाय महा-ई-सेवा केंद्रातून दाखले वेळेत मिळत नसल्याने अनेक प्रश्न उद्भवू शकतात. एखाद्या विद्यार्थ्याला वेळेत दाखला न मिळाल्यास त्याचे ऍडमिशन रद्द होऊ शकते. या अशा घटनांमधून एखाद्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले तर त्याला देखील प्रशासन जबाबदार असणार आहे. आमची मागणी आहे की जिल्ह्यातील सेतू कार्यालयाचे टेंडर पुन्हा एकदा काढावे आणि सेतू कार्यालय पूर्ववत करावे. येत्या दोन महिन्यात विद्यार्थ्यांचे ऍडमिशन सुरू होतील.
तसेच राज्यात सेतू कार्यालय कोठे हि बंद करण्यात आली नसून सर्व जिल्हय़ात रि टेंडर काढण्यात आली आहेत त्यामुळे वरील सर्व बाबींचा आपण योग्य विचार करून आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावे ही अपेक्षा या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
अन्यथा आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन प्रशासनाच्या विरोधात उग्र आंदोलन करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्रजी सकटेसर व माहिती सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन रणदिवे यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांना दिले आहे सदर निवेदनाच्या माहितीसाठी प्रत
1)मा विभागीय आयुक्त सो पुणे
2)मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो माळशिरस विभाग अकलूज
3)मा.तहसिलदार सो तहसील कार्यालय माळशिरस यांना दिले आहेत.
0 टिप्पण्या