माळशिरस तहसील कार्यालयासमोर कॉरिडॉरसाठी वार-गुरुवार 6 एप्रिल रोजी होणार लक्षणिक उपोषण

माळशिरस तहसील कार्यालयासमोर कॉरिडॉरसाठी वार-गुरुवार 6 एप्रिल रोजी होणार लक्षणिक उपोषण

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे कॉरिडॉरसाठी गारवड-मगरवाडी येथील ग्रामस्थांवर उपोषण करण्याची वेळ

प्रतिनिधी-माळशिरस 


बंगळुरू - मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये माळशिरस तालुक्यातील गारवाड या गावाची खासदार उदयनराजे भोसले यांनी देऊ केलेल्या साडेचार हजार एकर जमिनीचा समावेश झाला पाहिजे, या मागणीसाठी गारवाडचे ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी (दि. ६) माळशिरस तहसीलसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे या उपोषणामध्ये माळशिरस तालुक्यातील जनतेला सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कॉरिडॉरसाठी दोन लाख कोटींची मंजुरी मिळाली आहे. सध्या म्हसवड व धुळदेवची २९०० हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पासाठी कल्पनाराजे भोसले यांनी त्यांची गारवाडमधील १७९३ हेक्टर जमीन देऊ केली आहे. मात्र जमिनीचे भूसंपादन झाले नाही. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे वार गुरुवार दि. ६ एप्रिल रोजी तहसील कार्यालय माळशिरस येथे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय गारवड ग्रामस्थांनी घेतला आहे. येत्या तीन महिन्यांत गारवाडचा इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये समावेश न झाल्यास माळशिरस तालुक्यातील दोन्ही आमदारांना गावात प्रवेश बंदी करणार आहे गारवड येथील ग्रामस्थांनी सांगितले. या वेळी अॅड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे,भानुदास(आप्पा) सालगुडे, किशोर (भैय्या) सुळ,अजित (भैय्या) बोरकर, शिवराज पुकळे, सोमनाथ पिसे, अतुल सरतापे,गणेश इंगळे,राहुल बिडवे,आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या