श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर या कारखान्याचे रोलर पूजन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर या कारखान्याचे रोलर पूजन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न
प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611
श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर ता.माळशिरस च्या गळीत हंगाम २०२३-२४ चे मिल रोलर पूजन विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी कारखान्याच्या प्रस्तावित ५५०० मे.टन प्रतिदिवस गाळप क्षमतेच्या विस्तारीकरण कामाच्या पूर्वतयारीचा आढावा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतला या वर्षी (२०२३-२४) गळीत हंगामात कारखान्याने ५ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.  
त्यादृष्टीने सभासद,ऊस उत्पादक शेतकरी यांना जास्तीत जास्त ऊस दर देण्यास कारखाना व्यवस्थापन कटिबद्ध आहे. त्यामुळे सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पाठवावा असे आवाहन यावेळी बोलताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले.  
यावेळी श्री.शंकर सहकारी चे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी, संचालक बाबाराजे देशमुख, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील,शिवतेजसिंह मोहिते पाटील,दत्तात्रय रणवरे, संजय कोरटकर,चंद्रकांत शिंदे, रामदास कर्णे,सुरेश पाटील, धोंडीराम नाळे,सुधाकर पोळ, अर्जुन धाईंजे,शिवाजी गोरे, दत्तात्रय वाघमोडे,नंदन दाते,सुनील माने,दत्तात्रय चव्हाण, शिवाजी लवटे,सौ.अलका पाटील,शिवामृतचे संचालक अरविंद भोसले,नितीन इंगोले देशमुख,उपसरपंच विक्रम पाटील,विलास फडतरे,अनंतलाल दोशी,देविदास ढोपे,लालखान पठाण,उपसरपंच उदय धाईंजे,गोरक्षनाथ पालवे,संतोष शिंदे,दत्ता भोसले,बबन भुजबळ,लक्ष्मण मोहिते तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख,सर्व खाते प्रमुख, इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या