जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांना किरण साठेंनी जोरदार धक्का दिल्याची चर्चा ?
संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील आणि स्वरूपराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर अतिक्रमण काढण्याची झाली कारवाई ?
प्रतिनिधी : सचिन रणदिवे
मो नं 9730093611
यशवंतनगर मधील मारुतीचे मंदिर ते अकलूजमधील क्रीडा संकुल पर्यंत असलेल्या नीरा उजवा कालवा पाटबंधारे विभागाच्या फाट्यावर अतिक्रमण केलेल्यावर कारवाई करण्याची मागणी किरण साठे यांनी फलटण येथील नीरा उजवा कालवा कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली होती.
किरण साठेंच्या निवेदनाची तात्काळ दखल घेवून नीरा उजवा कालवा फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री संजय बोडखे यांनी माळशिरस पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता यांना पत्र काढून चौकशी करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार माळशिरस पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी संबंधित तक्रार ही पाटबंधारे विभाग शाखा खंडाळी यांच्या अंतर्गत येत असल्याने त्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार नीरा उजवा कालवा शाखा क्रमांक १ वरील वितरीका क्र.९ वरील अकलूज मायनर वरील टेल या फाट्यावर संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील आणि स्वरूपराणी जयसिह मोहिते पाटील यांनी अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्याने पाटबंधारे विभागाने दिनांक २२/६/२३ रोजी त्यांना पहिली नोटीस बजावली होती.त्यांच्या वतीने संबंधित नोटीस दिग्विजय दीपक गायकवाड यांनी स्वीकारली.संग्रामसिंह आणि स्वरूपराणी मोहिते पाटील यांच्या बरोबर इतर १४ जणांना पहिली नोटीस देण्यात आली आहे.संग्रामसिंह आणि स्वरूपराणी मोहिते पाटील यांना अतिक्रमण केल्याची नोटीस बजावल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती.किरण साठे यांनी केलेल्या तक्रारीवरून आणि केलेला पाठपुरावा यामुळे जयसिंह मोहिते पाटील यांच्या संग्रामसिंह आणि स्वरूपराणी मोहिते पाटील त्यांची मुलगा आणि मुलगी या दोघांनी केलेले अतिक्रमण पाटबंधारे विभागाच्या वतीने दिलेल्या नोटीस मुळे तात्काळ काढण्यात आले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.केलेले अतिक्रमण काढले असल्याने संग्रामसिंह आणि स्वरूपराणी यांच्यावर नामुष्की ओढवली असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात होताना दिसत आहे.
माळशिरस तालुक्यातील जाणता राजा म्हणून ज्यांना ओळखले जाते आशा जयसिंह मोहिते पाटील यांच्याच मुलांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली होती,त्यामध्ये केलेले अतिक्रमण काढल्याने जयसिंह मोहिते पाटील यांना किरण साठे यांनी जोरदार धक्का दिला असल्याची चर्चा तालुक्यातील जनतेमधून सुरू झाली आहे ?
0 टिप्पण्या