मनसेच्या वतीने नातेपुते नगरपंचायतीच्या मुख्यअधिकारी यांना साडी चोळी बांगडी व जिलेबी भेट देणार - आप्पासाहेब कर्चे

मनसेच्या वतीने नातेपुते नगरपंचायतीच्या मुख्यअधिकारी यांना साडी चोळी बांगडी व जिलेबी भेट देणार - आप्पासाहेब कर्चे 

प्रतीनिधी/सचिन रणदिवे 

महाराष्टू नवनिर्माण सेनेच्या वतीने नातेपुते नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना साडी चोळी बांगडी व जिलेबी भेट देणार असल्याचे निवेदन आज माढा लोकसभेचे अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी नगरपंचायत नातेपुते यांना दिले आहे 
या मध्ये त्यांचे म्हणणे असे आहे की गेल्या वर्षी दि 22/07/2022 ला मी माझा अर्ज अतिक्रमण कारवाई मध्ये आपण घेतलेले साहीत्य मला माघारी करा त्याचा रितसर दंड मी भरायला तयार आहे परंतु एक वर्ष आपण उडवा उडवीचे उत्तरे दिले तसेच एक पत्र लेखी दिले व त्यामध्ये आपण असे सांगताकी सदर अतिक्रमण पाटबंधारे खात्याच्या जागेत आहे जर ते त्या जागेत होते तर आपण आपल्या मशीनने काढून आपले कर्मचारी लावून आपल्या टॅक्टर मधून कसे घेऊन गेला त्यांचे व्हीडीओ व फेसबुक लाईव्ह माझ्याकडे आहे तरी आपण एक वर्षा मध्ये कारवाई केली नसल्यामुळेच गांधीगीरी मार्गाने आपणास दि 22/07/2023 रोजी साडी चोळी बांगडी व जिलेबी भेट देण्यात येणार आहे असे या निवेदनात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या