संघर्ष करिअर अकॅडमीचे संचालक राहुल वाघमोडे सर यांना विश्वकर्मा सोशल वेल्फर फाउंडेशन पुणे यांच्यावतीने समाजभूषण पुरस्कार प्रदान

संघर्ष करिअर अकॅडमीचे संचालक राहुल वाघमोडे सर यांना विश्वकर्मा सोशल वेल्फर फाउंडेशन पुणे यांच्यावतीने समाजभूषण पुरस्कार प्रदान 

संघर्ष करिअर अकॅडमी चे संचालक मा श्री राहुल वाघमोडे सर यांना विश्वकर्मा सोशल वेल्फर फाउंडेशन पुणे यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर यावेळी बोलताना राहुल वाघमोडे सर म्हणाले की
आज माझ्या जीवनात अत्यानंद निर्माण करणारे पत्र पाठवून माझी निवड समाजभूषण पुरस्कार करता झाल्याचे कळविले त्याबद्दल मी विश्वकर्मा सोशल वेल्फर फाउंडेशन पुणे यांचे मनापासून आभार मानतो.
     कारण हा पुरस्कार माझ्या जीवनामध्ये नक्कीच नवी क्रांती घडवेल.
    माझ्या जीवनातील हा मोठा भाग्याचा क्षण समजतो, कारण तुमच्यासारख्या नामवंत सामाजिक संस्थेकडून हा पुरस्कार मिळणे हा मी माझा खूप मोठा सन्मान समजतो,
     मी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेतली गेल्यामुळे सामाजिक कार्य करण्याचा माझा उत्साह अनेक पटीने वाढला आहे.
    ज्यांनी या पुरस्काराकरिता माझ्या नावाची शिफारस केली,तसेच ज्यांनी निवड केली त्यांना तर धन्यवाद देतोच, पण या प्रवासात माझे कुटुंब, मित्र, सहकारी, नातेवाईक तसेच संघर्ष करिअर अकँडमी या सर्वांचाच या पुरस्कारात सिंहाचा वाटा राहिला आहे हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो त्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानतो, असाच आपला आशीर्वाद कायम राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे ते माहिती सेवाभावी टाइम्स यांच्याशी बोलताना म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या