किरण साठेंचा स्तुत्य उपक्रम
प्रतिनिधी : अकलूज : दिनांक १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी माळशिरस तालुक्यातून अकलूज मध्ये हजारो अनुयायी उपस्थित राहत असतात आलेल्या अनुयायांना तसेच समाज बांधवांच्या स्नेह भोजनाची(जेवणाची) व्यवस्था बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण दादा साठे यांच्यामार्फत अकलूजमधील डॉ.आण्णाभाऊ साठे नगर,महर्षी कॉलनी,जुना पंढरपूर रोड अकलूज येथील समाज मंदिरात करण्यात आलेली आहे,सकाळी ११ वाजल्यापासून स्नेह भोजनाला सुरवात करण्यात आली.एकूण तालुक्यातील ११०० लोकांनी स्नेह भोजन केले.
अण्णाभाऊ साठे यांची जयंती ला वायपट खर्च करण्यापेक्षा त्या खर्चाला फाटा देऊन सामाजिक ध्येय डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही प्रकारचा वायपट खर्च न करता किरण साठे यांनी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या माळशिरस तालुक्यातील जनतेला स्नेह भोजनाची व्यवस्था केली होती.त्यांनी केलेल्या स्नेहभोजनाच्या व्यवस्थेमुळे अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांच्या चेहऱ्यावर समाधान असल्याचे दिसून येत होते.त्यांनी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.त्यांचा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना जनतेमधून व्यक्त केली जाते आहे.
0 टिप्पण्या