एसटी प्रवासात 50%सुट देण्यापेक्षा ती सुट गॅस सिलेंडर वरती द्या

एसटी प्रवासात 50%सुट देण्यापेक्षा ती सुट गॅस सिलेंडर वरती द्या
पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या होऊ द्या चर्चा कार्यक्रमास उदंड प्रतिसाद 
पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या होऊ द्या चर्चा कार्यक्रमास माळशिरस तसेच शेतकरी बांधवांचा अतिशय उदंड प्रतीसाद मिळत आहे,प्राध्यापक श्री लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दि 7/10/2023 रोजी सुळेवाडी येथील सर्व सामान्य जनतेशी व शेतकऱ्यांशी प्रा., लक्ष्मण हाके यांनी संवाद साधला असता नागरिकांनी अतिषय उत्स्फूर्त व बोलक्या प्रतिक्रिया दिल्या, महिला वर्ग वेगवेगळ्या समस्या मांडत असताना, एसटी सवलतीची गरज नसताना, कोणाची मागणी नसताना हि सवलत कशामुळे दिली?,सिलेंडर चे दर कमी करा,हि महिला वर्गाची मागणी असतानाही हे सरकार त्याकडे मात्र दुर्लक्ष करतंय अशा संतप्त प्रतिक्रिया महिलांच्या होत्या. पिण्यासाठी पाणी नाही, तेथे शेतकऱ्याने शेती कशी पिकवायची,या सारखे अनेक संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यां मधुन येत होत्या,प्राध्यापक श्री लक्ष्मण हाके यांनी मोदी सरकार व मिंदे सरकार कसे गोरगरीब जनतेचे लचके तोडत आहेत आणि मोठमोठ्या उद्योगपतींच्या घशात देश व राज्य घालत आहेत या विषयी व शासनाच्या अनेक योजना कशा फसव्या आहेत याची पोलखोल करुन लोकांना बोलते केले,हे सरकार किती फसवे आहे,किती खोटारडे आहे हे जनतेशी चर्चा करत असताना या दोन्हीही सरकारचा बुरखा फाडला, ठाकरे परत मुख्यमंत्री व्हावेत हि इच्छा अनेकांकडून येत होती‌.
हा कार्यक्रम माढा लोकसभा मतदार संघातील माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी, बचेरी,शिंगोर्णी,साळमुख,मळोली,वेळापूर, तांदुळवाडी या ठिकाणी संपन्न झाला, यावेळी शिवसेना प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मन हाके,शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख श्री. संतोष (भैय्या) राऊत, शिवसेना माळशिरस तालुका उपप्रमुख मा.डॉ.निलेश कांबळे, शिवसेना अकलूज शहर प्रमुख श्री. अनिल बनपट्टे, गट प्रमुख श्री. दादा मदने, शिवसैनिक श्री.दत्ता काशीद व इतर अनेक शिवसैनिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या