मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक अजित साठे यांची भाजपला सोडचिट्टी

मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक अजित साठे यांची भाजपला सोडचिट्टी 

प्रतिनिधी : वेळापूर : वेळापूर येथील मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक अजित साठे यांनी महाराष्ट्र विकास सेनेत अकलूज येथील आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मेळाव्यात पक्षप्रमुख किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला.यावेळी महाराष्ट्र विकास सेनेचे नेता दत्ता कर्चे, राज्य कार्यकारणी सदस्य राजेश खरे,पंढरपूर तालुका अध्यक्ष व माढा विधानसभा प्रमुख अर्जुन शेटे उपस्थित होते.


 वेळापूर येथील युवा कार्यकर्ते अजित साठे हे मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक म्हणून सर्व परिचित आहेत. सध्या भारतीय जनता पार्टी एससी मोर्चा माळशिरस तालुका सरचिटणीस म्हणून काम पाहत होते,मात्र मोहिते पाटील गटात जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना ताकद दिली जात नसल्याने व श्रेष्ठींनी लक्ष न दिल्यामुळे आपण महाराष्ट्र विकास सेना पक्षात जाहीर प्रवेश केला असल्याचे अजित साठे यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या