उद्या धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांची तोफ माळशिरस तालुक्यात कडाडनार

उद्या धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांची तोफ माळशिरस तालुक्यात कडाडनार 
प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611 

धनगर समाजाचा बुलंद आवाज विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा लढा आरक्षणाचा, लढा हक्काचा यासाठी महाराष्ट्रात धनगर जागर यात्रेनिमित्त जाहीर सभांचे आयोजन सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील सकल धनगर समाजबांधव यांच्यावतीने अकलूज-विजयवाडी रोड, गोसावी बुवा मंदिरा शेजारी, विझोरी, ता. माळशिरस, येथे सोमवार दि. 16/10/2023 रोजी सकाळी नऊ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
धनगर समाज बांधवांचा अनुसूचित जाती जमातीमध्ये समावेश व्हावा, यासाठी धनगर समाजाच्या आरक्षणाचे घोंगडे राज्य व केंद्र सरकारने भिजत ठेवलेले आहे. अनेकवेळा धनगर समाज बांधवांकडून मेळावे, मोर्चे, आंदोलने, उपोषणे झालेली आहेत. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी आरक्षणाचा प्रश्न निकालात निघालेला नाही.सध्या केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार आहे. भाजपमध्ये गोपीचंद पडळकर आहेत. त्यामुळे धनगर जागर यात्रा जाहीर सभांना विशेष महत्त्व असून धनगर समाज बांधवांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
माळशिरस तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव यांच्याकडून जोरदार जाहीर सभेची तयारी सुरू आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे.धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांची तोफ माळशिरस तालुक्यात कडाडनार हे मात्र नक्की आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या