पंढरपूर तालुक्यांमध्ये महाराष्ट्र मातंग परिषदेचा गाव भेट दौरा
मातंग समाज दखलपात्र झाला पाहिजे ज्ञानदेव (भाऊ) खंडागळे
मौजे पंढरपूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र मातंग परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव (भाऊ) खंडागळे यांनी पंढरपूर तालुक्यातील करकंब, भटुंबरे, तिसंगी येथे मातंग समाजाच्या विविध अडीअडचणी संदर्भात समाज बांधवांना भेट दिली महाराष्ट्र मातंग परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव (भाऊ) खंडागळे यांचे भटुंबरे येथे जंगी स्वागत करण्यात आले.याप्रसंगी भटुंबरे येथे महाराष्ट्र मातंग परिषदेचे गणेश वाघमारे, राजू सकट, लखन अडगळे, एकनाथ वाघमारे, मारुती मस्के, समाधान गायकवाड, शाम कसबे, दादा वाघमारे, करकंब येथे लहू गायकवाड, तानाजी पाटोळे, पप्पू गायकवाड यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मातंग समाज हा दखलपात्र झाला पाहिजे अशी वज्रमुठ बांधून महाराष्ट्र मातंग परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव (भाऊ)खंडागळे हे मैदानात उतरले असून मातंग समाज जोपर्यंत दखलपात्र होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याचे मत ज्ञानदेव (भाऊ) खंडागळे यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या