कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र विकास सेना पक्षाला जोरदार प्रतिसाद
प्रतिनिधी : नातेपुते : माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या फोंडशिरस पिरळे,दहिगाव,गुरसाळे,एकशिव,कळंबोली,मोरोची या गावात महाराष्ट्र विकास सेनेचे पक्षप्रमुख किरण साठे यांचा दौरा पार पडला.
महाराष्ट्र विकास सेना पक्षाची स्थापना केल्यानंतर पक्षप्रमुख किरण साठे यांनी पक्षाची बांधणी करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.त्यांनी भेटी दिलेल्या फोंडशिरस,दहिगाव,पिरळे,एकशिव,गुरसाळे,कळंबोली,मोरोची येथील कार्यकर्ते आणि जनतेने त्यांचे उस्फूर्तपणे स्वागत केले.फोंडशिरस येथे वाल्मिक रणदिवे,राहुल खिलारे,सचिन रणदिवे,धनाजी रणदिवे,स्वागत खिलारे,सागर खिलारे,दहिगाव येथे सचिन खिलारे,नाना पवार,किसन खिलारे,नाना खिलारे,हनुमंत खिलारे,गुरसाळे येथे ग्रामपंचायत सदस्य चांगदेव खिलारे,महादेव अवघडे,पिरळे येथे शिवा लवटे,बापूराव बुधावले,अनिल खिलारे,नितीन मदने,शाफिक शेख,अविनाश माने,मोरोची येथे आप्पासाहेब खिलारे,कळंबोली येथे सरपंच अनिता खिलारे,किरण खिलारे, सोपान खटके,एकशिव येथे हनुमंत इंगोले,महादेव सरगर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षप्रमुख किरण साठेंच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असल्याचे दिसून येत आहे,महाराष्ट्र विकास सेना पक्ष वाढविण्यासाठी साठेंनी जोरदार कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांच्या दौऱ्यात असलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीवरून दिसून येत आहे.
0 टिप्पण्या