शिवसेनेच्या राजीनाम्या नंतर प्रथमच मविसे शिष्टमंडळाची भेट.
प्रतिनिधी : पंढरपूर : शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांची महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे आणि त्यांच्या समवेत असलेल्या शिष्टमंडळाने पंढरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली,यावेळी मविसे नेते दत्ता कर्चे,राज्य समन्वयक अजित दादा साठे,राज्य कार्यकारणी सदस्य राजेश खरे, सोलापूर जिल्हा संघटक सागर बडवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष अर्जुन मामा शेटे,नवनाथ धोत्रे,आण्णा धोत्रे उपस्थित होते.
पक्षप्रमुख किरण साठे आणि त्यांच्यासमवेत गेलेल्या शिष्टमंडळाने साईनाथ अभंगराव यांच्या सदिच्छा भेटीत पक्ष वाढीसाठी मार्गदर्शन घेतले,यावेळी जिल्ह्यातील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.पुढील काळात महाराष्ट्र विकास सेनेला योग्य मार्गदर्शन करण्याचा शब्द माजी जिल्हा प्रमुख सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव यांनी महाराष्ट्र विकास सेनेच्या शिष्टमंडळाला दिला असल्याचे मविसे नेते दत्ता कर्चे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या