मौजे चौंडी (अहिल्यानगर) येथे आज 24 ऑक्टोबर 2023 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी याठिकाणी, यशवंत सेनेच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे - पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा.आ.श्री. अण्णासाहेब डांगे (मा.आमदार महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली,दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे बहुजनांचे नेते, माळशिरस तालुक्याच्या जनतेचे आमदार, लोकनेते श्री. उत्तमराव जानकर साहेब यांनी धनगर आरक्षणा संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका घेऊन, धनगर समाजाला सोबत घेऊन महाराष्ट्रातील धनगर व मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी तुमच्याबरोबर आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी भूमिका श्री .जानकर साहेबांनी व्यक्त केली.
यावेळी महाराष्ट्रातील धनगर समाजाचे मा. आमदार,प्रमुख नेते, पदाधिकारी, धनगर समाजाचे विविध संघटनांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव भगिनी उपस्थित होते.
0 टिप्पण्या