प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611
माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत 30/10 /2023 रोजी निवेदन दिले असून त्यामध्ये असे नमूद करण्यात आले की महाराष्ट्रात सर्वत्र मराठा समाज हा आरक्षण विषयावर आंदोलन करत आहे मराठा समाजाचे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे मराठा समाजातील मुख्य व्यवसाय शेती असून 99 टक्के मराठा समाज हा अल्पभूधारक आहे मराठा समाजात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मात्र मराठा समाजास आरक्षण नसल्याने गरीब मराठा कुटुंबातील मुले अनेक सोयी सुविधा पासून वंचित आहेत आज समाजाची परिस्थिती पाहता मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे तसेच मी महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य या नात्याने सकल मराठा समाजाच्या आरक्षण मागणीस व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या