विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकांचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाज उपयोगी प्रकल्प साकारावेत या दृष्टिकोनातून श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल सायन्सेस अँड रिसर्च टेंभुर्णी, महाविद्यालयाने प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अविष्कार प्रकल्प स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे विद्यापीठातर्फे महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील 48 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी औषध निर्माण शास्त्राचे विविध प्रकल्प सादर केले. विजेत्या स्पर्धकांची विभाग स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. संशोधन प्रकल्पांचे निरीक्षण महाविद्यालयाचे प्रा. सुकुमार लांडे, प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा. शिवराज ढगे, प्रा. प्रज्वला खपाले, प्रा. रेणुका शिंदे, प्रा. अक्षय भेंकी, प्रा. गंगा गोरे, प्रा. प्रियंका खडसरे यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. मनीष कोंडावर, संस्थेचे सचिव डॉ.आर.डी बेंदगुडे ,अध्यक्ष ॲड.विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. महादेवी भोसले यांनी काम केले.
0 टिप्पण्या