प्रांताधिकारी यांना बडतर्फ करण्याची मागणी करताच पाण्याचे टँकर सुरू

प्रांताधिकारी यांना बडतर्फ करण्याची मागणी करताच पाण्याचे टँकर सुरू 

महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या आंदोलनाची उपजिल्हाधिकारी यांनी घेतली दखल.

तालुक्यातील दुष्काळी ९ गावात पाण्याचे टँकर झाले सुरू 



प्रतिनिधी : विभागीय आयुक्त
पुणे विभाग पुणे यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने दिनांक ७ मार्च रोजी निवेदन देवून अकलूज प्रांताधिकारी यांच्यावर त्वरित शिस्तभंगाची कारवाई करून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली होती.



दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या माळशिरस तालुक्यातील भांब गावात तीव्र पाणी टंचाई असल्याने पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू करण्यात आलेला आहे.संबंधित गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही,त्या ठिकाणी चालू असलेला पाण्याचा टँकर गेली १५ दिवस झाले बंद आहे.दुष्काळ ग्रस्त गावातील जनतेला पाण्यासाठी वणवण फिरावे लागते आहे.असल्याचे महाराष्ट्र विकास सेना पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले होते.



सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी श्री अमृत नाटेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की माळशिरस तालुक्यातील भांब आणि पिंपरी गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू आहेत.मात्र वस्तुस्थिती पाहिल्यानंतर भांब गावात गेली १५ दिवस पाण्याचा टँकर बंद असल्याचे दिसून आले.तेथील जनतेशी संवाद साधला असता टँकर बंद असल्याचे स्पष्ट झाले होते त्यांनतर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी उपजिल्हाधिकारी यांना खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी आणि वरिष्ठ अधिकारी यांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली होती.

भांब गावात बंद असलेला पाण्याचा टँकर चालू करण्यात यावा असे माळशिरस पंचायत समितीच्या वतीने अकलूज प्रांताधिकारी यांना १० ते १२ दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला आहे,मात्र त्यांनी त्या पत्रव्यवहारावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही,दुष्काळी जनतेला शासनाच्या मिळणाऱ्या लाभापासून प्रांताधिकारी यांनी वंचित ठेवले आहे शासनाच्या योजनेचा फज्जा अकलूज प्रांताधिकारी यांनी उडविला आहे.स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुष्काळी जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने करण्यात आली होती.


माळशिरस तालुक्यातील दुष्काळी गावासह सोलापूर जिल्ह्यातील गावाचा आढावा घेवुन तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने माळशिरस तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलनातील मागण्यांसाठी पक्षप्रमुख किरण साठे यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्याकडे पाठपुरावा करून माळशिरस तालुक्यातील पाण्याचा टँकर सुरू करण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या प्रस्तावावर अकलूज प्रांताधिकारी यांना तात्काळ कार्यवाही करण्यासाठी आदेश दिल्याने महाराष्ट्र विकास सेनेच्या पाठपुराव्यामुळे माळशिरस तालुक्यातील कोथळे, बचेरी,फडतरी,निटवेवाडी,शिवार वस्ती,गारवड मगरवाडी,भांब,पिंपरी या गावात पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले आहेत.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या कामावर माळशिरस तालुक्यातील पाण्याचे टँकर सुरू करण्यात आलेल्या गावातील जनतेमधून समाधान व्यक्त केले जाते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या