दौंड तालुक्यातील बोरीबेल व गाडेवाडीचा गाव कामगार तलाठी एकच आहे.बोरीबेल व गाडेवाडीचा महसूल वेगळा असल्याने गाव कामगार तलाठी यांनी बोरीबेल गावाला व गाडेवाडीला आर्धा वेळ देण्यासाठी मा.तहसिलदार यांना त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.गाडेवाडी,शिंगाडेवाडी खोमणेवस्ती येथील सामान्य व गोरगरीब जनता व शेतकरी वर्गाला अनेक फेरफटका मारावा लागत आहेत.गाडेवाडी,शिंगाडेवाडी,खोमणेवस्तीवरील सर्व शेतकरी व सामान्य जनता नाराज आहे.बोरीबेलचे गाव कामगार तलाठी यांच्याकडे अनेक गावे आहेत.त्यामुळे गाव कामगार तलाठी आमच्याच गावात आले पाहिजे व आमच्या गावाची कामे केली पाहिजे.अशी प्रत्येक गावातील ग्रामस्थ मागणी करत आहेत. आठवड्यातून एक ते दोन तहसिल कार्यालयात मिटींग असतात तर आता विलक्षणचे काम सुरू होणार आहे.त्यासाठी गाव कामगार तलाठी यांनी दौंड तालुक्यातील जे गावे गाव कामगार तलाठी यांच्याकडे त्या प्रत्येक गावाला वेळ व टाईम ठरून द्यावा.तसेच बोरीबेल गावातील आर्धा वेळ गाडेवाडी या ठिकाणी दिलाच पाहिजे.गाडेवाडीचे दप्पतर गाडेवाडीत आणले पाहिजे अशी मागणी गाडेवाडी, शिंगाडेवाडी,खोमणेवस्ती येथील ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.यावर मा.तहसिलदार यांनी त्वरीत निर्णय घेवून गाव कामगार तलाठी यांना तातडीने आदेश द्यावेत अशी मागणी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.संदीप लगड यांनी केली आहे.गाव कामगार तलाठी श्री जी.एन महाजन यांनी पुरंदर तालुक्यात अनेक गावात चांगले काम केल्याने महाराष्ट्र दिन दिनांक १ मे,२०१८ प्रशस्तीपत्र मा.नवकिशोर राम जिल्हाधिकाधिकारी पुणे यांनी गुणगौरव करून सन्मानित करण्यात आले आहे.त्यामुळे गाव कामगार तलाठी श्री महाजन यांनी गाडेवाडीतील कार्यालयात लवकरात येवून मौजे गाडेवाडी, शिंगाडेवाडी,खोमणेवस्तीवरील शेतकऱ्यांची व सामान्य व गोरगरीब जनतेची कामे करण्यासाठी गाव कामगार तलाठी यांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
0 टिप्पण्या