माळशिरस येथे शिवसेनेचे शाखा क्रमांक एक चे दिमाखात उद्घाटन संपन्न

माळशिरस येथे शिवसेनेचे शाखा क्रमांक एक चे दिमाखात उद्घाटन संपन्न

प्रतिनिधी (माळशिरस) ; कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे शिवसेना सचिव संजयजी मशीलकर साहेब व संपर्क प्रमुख महेश नाना साठे जिल्हाप्रमुख चरण राज चवरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सपकाळ, उपजिल्हाप्रमुख दीपकजी खंडागळे यांच्या हस्ते माळशिरस येथील फुलेनगर शाखा क्रमांक एकचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी माळशिरसचे सामाजिक कार्यकर्ते महादेव तूपसुंदर युवा नेते भैय्या धाईंजे, पिरळे शाखाध्यक्ष अक्षय खिल्लारे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर भाऊ साठे, समाधान आव्हारे, अजित साठे, नातेपुते शहर प्रमुख समीर शेख, वैद्यकीय मदत कक्षाचे बापू क्षीरसागर, संजय दनाने, निखिल पलंगे, मेजर अनिल दडस, यावेळी फुलेनगर शाखाध्यक्ष महादेव जगताप उपाध्यक्ष अमोल मिसाळ कार्याध्यक्ष अमोल जाधव सचिव कृष्णा शेगर, खजिनदार अमोल खरात यावेळी फुलेनगर शाखा क्रमांक १ चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या