दुष्काळी उपाययोजना मिळवून देण्यासाठी केले प्रसिद्धी पत्रक जाहीर
प्रतिनिधी : माळशिरस : सोलापूर जिल्ह्यातील सत्तेतील आणि विरोधातील आमदार,खासदार असलेले लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष व त्यांचे नेते लोकसभा निवडणुकीत गुंतले आहेत,जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यातील गावात जनतेला पिण्यासाठी पाणी आहे की नाही ? याची काळजी राजकीय पक्ष आणि नेत्यांना राहिली नाही तसेच दुष्काळग्रस्त गावातील जनतेला शासनाच्या माध्यमातून दिले जाणारे लाभ उपाययोजना केल्या आहेत का ? याचा आढावा घ्यावा अस वाटत नसल्याची खंत महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आणि माढा लोकसभा मतदारसंघातील ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे,अशा गावातील सर्वसामान्य जनतेने महाराष्ट्र विकास सेना पक्षाशी त्वरित संपर्क साधावा त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत उपाययोजना उपलब्ध करून दिल्या जातील.सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणारे प्रश्न आणि गोरगरीब,उपेक्षित,शोषित पिडीत,वंचित या घटकातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा जन्म झाला आहे.सोलापूर जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला असून त्या दुष्काळग्रस्त सर्वसामान्य जनतेपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जाणारे लाभ जनतेला मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.ज्या दुष्काळग्रस्त गावातील सर्वसामान्य जनतेला लाभ दिले गेले नाहीत अशा सर्व दुष्काळग्रस्त गावातील मायबाप जनतेने महाराष्ट्र विकास सेना पक्षाशी संपर्क साधावा त्यांना राज्य सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ निश्चितपणाने मिळवून दिला जाईल.अशी भावनिक साद महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने घालण्यात आली आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये असाच प्रसंग उद्भवलेला होता या माळशिरस तालुक्यामध्ये फक्त दोन गावांमध्ये पाण्याची टँकर चालू होते मात्र महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून आंदोलन उभा करून या माळशिरस तालुक्यामध्ये एकूण नऊ गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू करण्याचं काम महाराष्ट्र विकास सेना पक्षाने केलेल्या आंदोलनाने झाले आहे. असा दाखला महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी जिल्ह्यातील जनतेला दिला आहे.त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील व माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त गावातील सर्वसामान्य जनतेला या सरकारच्या व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील।असे सांगून महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अवाहन करून पक्षाचे पदाधिकारी असलेले अनिल,साठे-,सचिव ९८६०३२२४१४,अजित साठे - समन्वयक 9503409444,दत्ता कर्चे - नेता- 9970566262,राजेश खरे - पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष 9112174516 यांचे मोबाईल नंबर सार्वजनिक केले आहेत.
0 टिप्पण्या