सकल मातंग समाजाची नातेपुते येथे चिंतन बैठक
प्रतिनिधी, नातेपुते
मौजे नातेपुते तालुका माळशिरस येथे सकल मातंग समाजाची चिंतन बैठक दिनांक 17/3/2024 वार रविवार रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
मातंग समाजाच्या विविध समस्या मोठ्या प्रमाणात फोफावत चाललेल्या आहेत.मातंग समाजाला शासकीय, राजकीय व सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे.मूळ प्रवाहातून मातंग समाजाला वेगळे टाकण्याचा प्रयत्न होत आहे. इतिहासामध्ये राजे, महाराजे ,सम्राट असणारा क्रांती करनारा समाज जातीव्यवस्थेमुळे प्रगती पासुन कसा लांब गेला? मूळ प्रवाहात येण्यासाठी सकल मातंग समाजाने एकत्र येऊन लढा उभा करण्याचे योजले आहे.तीसरी बैठक संपन्न होत आहे तरी सर्व मातंग समाज बांधवांनी नातेपुते येथे बहुसंख्येने उपस्थित राहून आपले विचार मांडण्यासाठी एकत्र यावे.
0 टिप्पण्या